Skip to content

Salman Khan: गँगस्टरच्या धमकीनंतर ‘ गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवली


Salman Khan: मुंबई : बॉलीवूडचे अभिनेता सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. म्हणून या धमकीनंतर सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेरील सुरक्षा पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. रात्री पासून मुंबई पोलिसांचे जवान सलमानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर तैनात होते. सलमानच्या घराबाहेर त्यांच्या चाहत्यांनी गर्दीही जमू देत नाहीये. धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेचा काटेकोर बंदोबस्त करण्यात आला आहे.

सलमान खानला धमकीचा इ- मेल
सलमानचा मॅनेजर गुंजलवारला 18 मार्च रोजी एक धमकीचा एक मेल मिळाला होता. या मेलमध्ये सलमान सोबत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. कोणी तर रोहित गर्ग या नावाने मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं की ‘गोल्डी ब्रारला तुझा बॉस आहे , म्हणजेच सलमान खानशी बोलायचं आहे. मुलाखत पाहिली असेल त्याने कदाचित. जर मुलाखत बघितले नसेल तर त्याला मुलाखत बघायला सांग. मॅटर क्लोज करायचं असेल तर डिरेक्टर त्याच्याशी बोलू दे. फेस-टू-फेस करायचं असेल तर तसंही सांग. आता वेळ आहे म्हणून माहिती दिली आहे, नाही तर झटका देणार . (Salman Khan )

या धमकीचा ई-मेलनंतर सलमानच्या मॅनेजरने मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीरता पाहून पोलिसांनी IPC च्या कलम 506 (2), 120 (B), 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात खटला दाखल केलेला आहे. त्याचसोबतच सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला हवी सलमान कडून माफी
सलमानला जीवे मारण्याची धमकीदेणें ही काही पहिलीच वेळ नाही. तर काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने खानला जेल मधून धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये लॉरेन्सने 1998 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानकडे माफीची मागणी केली होती . अन्यथा परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा त्याने दिला होता . सलमान खानने आमच्या समाजाची माफी मागावी, असं लॉरेन्स म्हणाला.

मारण्यासाठी केली होती रेकी
नुकतेच गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या वडिलांना एक धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘तुमचाही आम्ही मुसेवाला करू’ अशी त्या धमकी पत्रातून देण्यात आलेली होती. यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमान खानची रेकी तीन जणांनी केली होती. तर कपिल पंडितला पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

…. तर मी राजकारणातून संन्यास घेईल; भुसेंनी राऊतांना खडसावले

सलमानला शस्त्र वापरण्याची परवानगी
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र वापरण्याची परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला आहे . लॉरेन्स बिश्नोई हे सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांनी सलमानच्या धमकी विषय बिश्नोईही चौकशी केली होती. मात्र त्याने या गोष्टीवर साफ नकार दिला होता. (Salman Khan )


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!