Deola rain: देवळा तालुक्यातील दहिवड येथे गारांचा पाऊस झाल्याने कांदा , डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे . (Deola rain)
शनिवार (दि.१८) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळादेवळा तालुक्यातील दहिवड येथील भौरी मळा परिसरात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गारा पडल्या काही ठिकाणी पाऊस नसतांना नुसत्या गाराच पडल्याने शेतकऱ्यांत कुतूहल वाटू लागले. (Deola rain)
Ajit Pawar on Farmers: ‘शेतकरी टिकला तर राज्य टिकेल’
यामुळे डाळिंब , कांदा,गहू व डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीमालाचा शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी ,अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे , शेरी , कनकापूर ,वार्शी व हनुमंतपाडा परिसरात देखील अवकाळी पाऊस झाल्याने कांदा या नगदी पिकाचे नुकसान झाले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम