Skip to content

Sarvtirth taked : म्हैसवळण घाट रस्त्यासंदर्भात मनसेचे इगतपुरी तहसीलला निवेदन


Sarvtirth taked : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक-नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण इगतपुरी-म्हैसवळण घाट मार्गे अकोले तालुक्यात जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सप्टेंबर २०२२ मध्ये या म्हैसवळण घाट भागात जोरदार अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता या ढगफुटीत म्हैसवळण घाटात अनेक ठिकाणी मोठं मोठ्या दरड कोसळल्या अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला.तर अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला या रस्त्यावर टाकेद गावापासून ते संपूर्ण घाट रस्ता पूर्णपणे खड्डयांच्या साम्राज्यात आजही खितपत पडून आहे. (Sarvtirth taked )

Ram Navami Clash: बंगाल-बिहारपाठोपाठ झारखंडमध्येही भडका, शोभा यात्रेवर दगडफेक; पोलिसांची गाडीही फोडली

अकोले तालुक्यातील एकदरा, खिरविरे, कोंभाळणे, कोकनवडी, जायनावाडी, तिरडे, पाचपट्टा, केळी ठाणगाव सह अनेक गावांमधून वाहनधारक प्रवासी, शेतकरी वर्ग इगतपुरी तालुक्यातील टाकेद-घोटी या ठिकाणी बाजारपेठ मार्केट मध्ये रोज मोठ्याप्रमाणात येत असतात तर अकोले आणि इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी शासकीय सेवेत असणारे शिक्षण आरोग्य कृषी यांसह सर्व विभागाचे कर्मचारी, व्यापारी, शेतकरी यासोबतच सर्वतीर्थ टाकेद, पट्टाकिल्ला, बितनगड, विश्रामगड याठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या शैक्षणिक पर्यटन सहल, पर्यटन, पर्यावरण प्रेमी, कायम म्हैसवळण घाट रस्त्याने प्रवास करतात या खड्डेमय म्हैसवळण घाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था असल्यामुळे या म्हैसवळण घाटात कायम छोटे मोठे जीवघेणे अपघात हे सातत्याने होत असतात या रस्त्याची अत्यंत लाजिरवाणी जीवघेणी खड्डेमय परिस्थिती आहे तरी देखील ना विलाजास्तव या रस्त्यावरून येथील स्थानिकांना प्रवासी, पर्यटक, व्यापारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी नोकरदार वर्ग वाहनधारकांना या रस्त्यावरून दररोज जिकिरीचे जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.

अडसरे बु ते भंडारदरावाडी हा अत्यंत महत्वपूर्ण पणाळ रस्ता सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटलेल्या पाझर तलावामुळे पूर्णपणे वाहून गेला अद्यापही त्या रस्त्याची आजपर्यंत कोणतेही दुरुस्ती झालेली नाही तरी हा रस्ता तात्काळ नव्याने करण्यात यावा.यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक उप जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ किर्वे यांच्या नेतृत्वाखाली टाकेद खेड गटातील मनसे कार्यकर्त्यांनी बुधवार ता.२९ इगतपुरी तहसीलदार कार्यालयात प्रशासन नायब तहसीलदार अनिल मालुंजकर यांना विनंती निवेदन दिले.

म्हैसवळण घाट येथील रस्त्याला अनेक ठिकाणी या रस्त्याच्या कडेला सरंक्षण भिंत कठडे नाहीत तर अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद झाला आहे.तर अनेक ठिकाणी या रस्त्याला अपघात प्रवण क्षेत्र बनलेले आहेत मागील काळात हा टाकेद फाटा ते टाकेद मार्गे म्हैसवळण घाट रस्ता प्रजीमा 27 मध्ये मंजूर होता परंतु अद्यापही मंजूर असतांना या रस्त्याचे कामकाज पूर्ण झाले नाहीत गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तरी आदरणीय महोदय या रस्त्यासंदर्भात आपण तात्काळ चौकशी लावून संबंधित बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करावेत व हा अत्यंत दयनीय असलेला अरुंद म्हैसवळण घाट रस्ता रुंद करून तात्काळ नव्याने दुरुस्ती करावा व चांगल्या प्रतीचा टाकेद फाटा ते टाकेद गाव मार्गे म्हैसवळण घाट रस्ता नव्याने बनविण्यात यावा असे या निवेदनात म्हंटले आहे.नायब तहसीलदार अनिल मालुंजकर यांना निवेदन देतेवेळी मनसे उप जिल्हाध्यक्ष संदिप किर्वे, मूळचंद भगत,गटनेते अशोक गाढवे,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,मनसैनिक सागर गाढवे,किरण साबळे,मंगेश गाढवे,जालिंदर करवंदे, निलेश गाढवे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

“गेल्या अनेक वर्षांपासून टाकेद-म्हैसवळण घाट रस्त्याची दयनीय दुरवस्था आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे याठिकाणी सातत्याने लहान मोठे अपघात होत असतात या रस्ता प्रश्नाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष्य द्यावे.”
संदीप किर्वे मनसे उपजिल्हाध्यक्ष

“१ सप्टेंबर २०२२ च्या रात्री म्हैसवळण घाट परिसरात मोठ्याप्रमाणात जोरदार ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली यात टाकेद-म्हैसवळण घाट रस्ता,फळविरवाडी येथील पाझर तलाव,स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी,अडसरे ते भंडारदरावाडी पणाळ रस्ता पूर्णपणे वाहून गेला खचला अनेक लोकप्रतिनिधीनी याची फक्त नावालाच पाहणी केली परंतु अद्यापही हे प्रश्न प्रलंबित आहे.तरी संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनाने याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी.
राम शिंदे (सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु).


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!