राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील कलावंतांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या ठोकळवाडी येथे ग्रामदैवत चौराई माता यात्रा उत्साहात संपन्न झाली. चौराई माता यात्रा उत्सवानिमित्त ठोकळवाडीतील लोककलावंत लक्ष्मण गभाले, वगसम्राट भाऊसाहेब करवंदे, गायक राजाराम करवंदे, विनोद सम्राट दत्तू गभाले, वगसम्राट तुकाराम ठोकळ, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर करवंदे, विजय ठोकळ, ज्ञानेश्वर
जाधव, सुखदेव गभाले, रवींद्र बांबळे, गंगाराम करवंदे, सुभाष ठोकळ यांच्यासह सर्व कलाकार यांच्या वतीने चौराई माता तमाशा मित्र मंडळ याचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वतीर्थ टाकेद | सर्वतीर्थ टाकेद येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन
सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मनोरंजनात्मक लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाला ठोकळवाडीसह टाकेद पंचक्रोशीतील बहुसंख्य तमाशा प्रेमी यांनी उपस्थिती दर्शविली. ठोकळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या मनोरंजनात्मक लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाप्रसंगी रक्ताने रक्ताचा टिळा अर्थात भिलाची टोळी हे वगनाट्य सादर करण्यात आले. तमाशा म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लोकलावंतांची लोककलेची खरी संस्कृती याच जाणिवेतून या खऱ्या कलावंतांना रसिक प्रेक्षकांनी दाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हरिनामाच्या जयघोषात दुमदुमले सर्वतीर्थ टाकेद; अखंड हरिनाम साप्ताहाची सांगता
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम