मुंबई: राज्यात राजकीय वातावरण असतानाच आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. यानुसार, कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचे मान्य करण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याची कबुली आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआयए न्यायालयात दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक दल, विश्व हिंदू परिषद व योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा खळबळजनक दावा पुरोहित यांनी केला आहे. (Malegaon Blast)
Malegaon Blast | नेमकं प्रकरण काय..?
मालेगाव येथे एका मशिदीच्या परिसरात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट करण्यात आला होता. बॉम्बस्फोटात सात व्यक्ती मृत्युमुखी पडले होते. तर, अनेक जखमीही झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी व अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) करत होतं. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. (Malegaon Blast)
Malegaon | अन्यथा मतं मागायला येणार नाही; भामरेंना ‘त्या’ घोषणांचा विसर..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम