मिरज : सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक (Sangli crime news) घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे.
दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. ही दुखत माहिती मिळताच सांगली तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Sangli crime news) सोमवारी सकाळी उशिरापर्यंत वनमोरे कुटुंबाचे दार बंद होते. शेजारी व ग्रामस्थांनी त्यांना फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतू तिथूनही त्यांना काहीच ऊत्तर मिळाले नाही.
हे सुद्धा वाचा :
निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला ; भाजपाला दिलासा , काँग्रेस तोंडघशी
इतर गावकऱ्यांना या गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. त्यानंतर पोलिसांना त्यांनी संपर्क साधला. पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार विषबाधा झाल्यामुळे या नऊ जणांचा मृत्यू (Sangli crime news) झाला आहे. आर्थिक अडचण भासत असल्यामुळे या संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे
माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) मृत व्यक्तींची नावे. (Sangli crime news)
काँग्रेसने आक्षेप घेतल्याने मतमोजणीस विलंब ; निवडणूक आयोगाची बैठक सुरू
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम