काँग्रेसने आक्षेप घेतल्याने मतमोजणीस विलंब ; निवडणूक आयोगाची बैठक सुरू

0
24

मुंबई : निवडणुकीच्या निकालाला काही मिनिट उरलेले असताना काँगेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर आक्षेप घेतला असून त्याची तक्रार निवडणुक आयोगाकडे केली असल्याची बातमी समोर सूत्रांनी दिली आहे.

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतपत्रिका ही त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान पत्रिकेत टाकली असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं काॅंग्रेसने म्हटले आहे. मात्र भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सांगीतले की आधीच परवानगी घेतली आहे. काँग्रेसचा हा आरोप बालिश असून ही विकृती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतला असून त्याची तक्रार केंद्रीय निवडणुक आयोगाकडे देखील केली असल्याची माहिती काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कितीही आक्षेप घेतला तरी त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

आजारी आमदारांना मतदान करताना मदत घेता येतो त्या पद्धतीची तरदूत देखील नियमात केली असल्याचे माजी विधीमंडळाचे सचिव यांनी अनंत कळसे यांनी सांगितले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत देखील हा नियम असून त्यावर आता निवडणुक आयोग काय निर्णय देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यावतीने दुसऱ्यांनी मतदान केले आहे. त्यासाठी निवडणुक आयोगाकडे परवानगी घेण्यात आली होती. असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे मतमोजणी आता लांबणीवर पडणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here