Skip to content

निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला ; भाजपाला दिलासा , काँग्रेस तोंडघशी


मुंबई : निवडणुकीच्या निकालाला काही मिनिट उरलेले असताना काँगेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर आक्षेप घेतला असून त्याची तक्रार निवडणुक आयोगाकडे केली होती मात्र हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळला असून केंद्रिय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलं आहे.

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतपत्रिका ही त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान पत्रिकेत टाकली असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं काॅंग्रेसने म्हटले आहे. मात्र भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सांगीतले की आधीच परवानगी घेतली आहे. काँग्रेसचा हा आरोप बालिश असून ही विकृती असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतला असून त्याची तक्रार केंद्रीय निवडणुक आयोगाकडे देखील केली असल्याची माहिती काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कितीही आक्षेप घेतला तरी त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले होते.

आजारी आमदारांना मतदान करताना मदत घेता येतो त्या पद्धतीची तरदूत देखील नियमात केली असल्याचे माजी विधीमंडळाचे सचिव यांनी अनंत कळसे यांनी सांगितले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत देखील हा नियम असून त्यावर आता राज्य निवडणुक आयोगाने देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे.

दरम्यान, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यावतीने दुसऱ्यांनी मतदान केले आहे. त्यासाठी निवडणुक आयोगाकडे परवानगी घेण्यात आली होती. असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे मतमोजणी आता लांबणीवर पडणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!