Skip to content

काँग्रेस निवडणूक आयोगा विरोधात कोर्टात जाणार ; मतमोजणीला पुन्हा विलंब


मुंबई : भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसने घेतल्याने मतमोजणीला विलंब झाला मात्र हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला असून या निर्णयविरोधात काँगेस कोर्टात जाणार असल्याची माहिती काँगेसने दिली आहे, राज्य निवडणूक आयोग विरोधात काँगेस कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काॅंग्रेसने भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. या दोघांनी टाकलेले मत हे त्यांचे मत नव्हतेच, असा आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

आज अतिशय रंगतदार झालेल्या विधान परिषदे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काॅंग्रेसने भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला. या दोघांनी टाकलेले मत हे मत त्याचे नव्हतेच, असा आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर बोलताना मुक्ता टिळक म्हणाल्या की राज्यसभेच्या मतदानाच्या वेळी जी प्रक्रिया राबवली होती त्यानुसारच या वेळीही मतदान केले आहे. या मतदानासाठी 16 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र द्यायचे होते. ते मी दिले असून निवडणूक आयोगाने माझे पती शैलेश यांना मदतनीस म्हणून नियुक्तीचे पत्र कालच दिले होते. त्यामुळे नियमानुसारच माझे मतदान झाले आहे. अशी माहिती टिळक यांनी दिली.

काॅंग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब झाला आहे. भाजपा नेते म्हणता आजारी मतदारांना दुसऱ्यांचे सहकार्य घेऊन मतदान करण्याचा अधिकार असून काॅंग्रेस या तक्रारीवर तोंडावर आपटले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. दुसरीकडे विधीमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे यांनीही आजारी मतदारांना 18 वर्षावरील सज्ञान व्यक्तीच्या मदतीने मतदान करता येत असल्याचा नियम सांगितला. मात्र उमेदवाराने आपले मत कोणालाही दाखवता कामा नये, अशी अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता काँगेस कोर्टात जाणार असल्याने पुन्हा मत मोजणी लांबण्याची चिन्हे आहेत. सर्वांचे लक्ष केंद्रिय निवडणूक आयोगाकडे लागून आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!