Sandalwood Smuggler | ‘पुष्पा गँग’चे थेट नाशिक पोलिसांना आव्हान; पोलीस अधिक्षकांच्या बंगल्यात घुसखोरी

0
47
Sandalwood Smugglers
Sandalwood Smugglers

नाशिक :  नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानातच दरोडा टाकण्याचा प्रयत्न ‘पुष्पा’ गँगने केला आहे. चंदन चोरांनी पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी चंदन चोरी करण्यासाठी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला असून, याद्वारे या चंदन चोरांच्या टोळीने (Sandalwood Smugglers) थेट नाशिक पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

दरम्यान, पोलिस लाइनमधील पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात तब्बल सहा दरोडेखोर घुसले होते. हे दरोडेखोर पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातील चंदन चोरी करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला. तर, यापैकी दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, सरकारवाडा पोलिस ठाण्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांत दरोड्याच्या प्रयत्नाची फिर्याद देण्यात आली.

बिबट्याची कातडी विकणारे सराईत गुन्हेगार वनविभागाच्या ताब्यात

Sandalwood Smuggler | नेमकं काय घडलं..?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी पहाटे 2.45 ते 3.30 यादरम्यान पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात सहा अज्ञातांनी प्रवेश केला. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, दांडके, दगड आणि कटर मशिनही होते. मात्र, तेथील सुरक्षा रक्षक, पोलीस सावध झाली आणि चोरट्यांनी पळ काढला. थेट पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिक गुन्हे शोध पथक अॅक्टिव झाले आणि त्यांनी संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान, यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी चोरीच्या प्रयत्नाची कबूलीही दिली.

देवळा तालुक्यात चोरटे ‘वस्तीत’ वनविभाग ‘सुस्तीत’ ; चंदनाची झाडे चोरीला

चार ते पाच टोळ्या कार्यरत

मागील आठवडाभरातच नाशिक शहर व ग्रामीण भागात चंदनचोरीच्या पाचपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यातील केवळ ओझर येथील एकच गुन्ह्याचा तपास लागला आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात परभणी, सिल्लोड, जालना, भुसावळ, जळगाव यासह इतर जिल्ह्यातील चंदन चोरांच्या चार ते पाच टोळ्या कार्यरत झाल्याचे समोर येत आहे. तर, याआधीही विशेष पोलीस महानिरीक्षक, सेंट्रल जेलचे कारागृह अधीक्षक, आयुक्तांच्या निवासस्थानीही चंदनाची चोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here