Deola | देवळा तालुका अखिल भारतीय सरपंच परिषदेची कार्यकारणी जाहीर

0
24
Deola
Deola

देवळा |  पंचायत राज विकास मंचच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेची देवळा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्ष पदी सरस्वतीवाडीचे सरपंच चंद्रकांत आहेर, कार्याध्यक्षपदी माळवाडीचे उपसरपंच मयुर बागुल, सरचिटणीस पदी सुभाष नगरचे सरपंच शरद माळी यांची निवड करण्यात आली, अशी माहिती तालुका अध्यक्ष वैभव पवार यांनी दिली.

देवळा तालुका सरपंच परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये कृतिशील सरपंच व उपसरपंच, सदस्य तसेच महिला सरपंच यांना समावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. निवड करताना समतोल राखण्याचा प्रयत्न करत गाव विकासासाठी सक्रिय असणाऱ्यांना संधी देण्यात आल्याचे यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष वैभव पवार यांनी सांगितले.

Deola | देवळा शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

तालुका कार्यकारिणीत सदस्य पौर्णिमा सावंत (लोकनियुक्त सरपंच डोंगरगाव), सुरेखा ठाकरे (सरपंच महालपाटणे), निंबा अहिरे (लोकनियुक्त सरपंच फुलेनगर), मोहन पवार (सरपंच मटाणे), वैशाली पवार (लोकनियुक्त सरपंच चिंचवे), सुनिल देवरे ( उपसरपंच वाजगाव), मंगेश आहेर (उपसरपंच वाखारी), नदीश थोरात (उपसरपंच पिंपळगाव), जगदीश शिंदे (उपसरपंच कणकापुर), समाधान ठाकरे (उपसरपंच कुंभार्डे), विनोद आहेर (उपसरपंच गुंजाळनगर), वैशाली अहिरे (सदस्य, सांगवी), दादाजी मोरे (सदस्य भऊर), तुषार शिरसाठ (सदस्य मेशी), छाया देवरे (सदस्य उमराणे) यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here