सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवळा येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आदींनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी दिनाचे औचित्य साधून एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांच्या हस्ते भिमकेत ता.सटाणा येथे शाखेचे अनावरण करण्यात आले.
Satana vidhansabha | रघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी
जिल्हा अध्यक्ष रघु नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा व देवळा तालुक्यात आदिवासी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी देवळा शहरात समाज बांधवानी भव्य मिरवणूक काढली. तसेच तालुक्यातील गावागावांत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला होता. ठिकठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे औक्षण करत अभिवादन करण्यात आले. मिरवणुका शांततेत पार पडल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम