Sakal Maratha Samaj | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सगे सोयऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र, काल मंत्री शंभुराज देसाई आणि खासदार संदीपान भूमरे यांनी मनधरणी करत आणखी एक महिन्याचा कालावधी मागितल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घतेले. दरम्यान, यानंतर आज नाशिकमध्ये वातावरण तापले असून, नाशिकमधील सकल मराठा समाजाने शरद पवार यांना विनंती केली आहे. तसेच विनंती मान्य न केल्यास शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
सकल मराठा समाजाचे (Sakal Maratha Samaj) समन्वयक करण गायकर (Karan Gaikar) म्हणाले की,”पक्ष फुटल्यानंतर ज्याप्रकारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेतृत्व केले. त्याप्रकारे त्यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांतील नेत्यांना सोबत घेत अंतरवाली सराटी येथे जाऊन संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाला मार्गदर्शन करावे. तसेच जर शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेत हा प्रश्न सोडवला तर हा संपूर्ण मराठा समाज राजकीयदृष्ट्या देखील आपल्यासोबत सक्रिय राहील. (Sakal Maratha Samaj)
Maratha Reservation | सरकारला नवा अल्टीमेटम; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित
पहिले उपोषण शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर
मात्र, जर आपण आम्हाला पाठिंबा देणार नसाल. तर मराठा समाज राज्यभर लाक्षणिक उपोषण करेल आणि आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या निवास स्थानापासूनच असेल, असा इशारा सकल मराठा समाजाने शरद पवारांना दिला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) संबंधित आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यानंतर आम्ही सर्वच राजकीय पक्षांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत आवाहन केले होते. तसेच शरद पवारांनीही सर्व राजकीय पक्षांतील मराठा आरक्षण समर्थक नेत्यांना एकत्रित आणून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना विनंती करत एक महिन्याचा आणखी वेळ मागितला आहे.(Sakal Maratha Samaj)
Sakal Maratha Samaj | चार-पाच दिवसात शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
असे असतानाही मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली असून, आम्ही शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर कोणतेही आंदोलन न करण्याबाबत इशाराही दिला आहे. तर, याचा आम्ही निषेध व्यक्त करत असून, आम्हाला कितीही नोटीसा पाठवल्या तरी आंदोलन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही हे आंदोलन संविधानिक पद्धतीने करणार आहोत.(Sakal Maratha Samaj)
या प्रकरणी येत्या चार ते पाच दिवसात शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी आता पुढाकार घ्यावा. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या. कारण या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम