Maharashtra Assembly Election 2024 : देशात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) आटोपल्यानंतर आता संपूर्ण राज्याला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे(Maharashtra Assembly Elections 2024). येत्या ३ ते ४ महिन्यात विधानसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, या पर्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण २०० ते २५० जागा लढवणार असल्याचे सांगितले. यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांचा पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार हे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात जसे दृश्य पहायला मिळाले. तसेच काहीसे विधानसभा निवणुकीतही पहायला मिळतील. विधानसभा निवडणूकही महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशीच लढत होईल, असं अद्याप तरी दिसतंय… कारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल..? हे काही सांगता येत नाही. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचा कौल हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा कोणता पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार..? याबाबत जनतेतही उत्सुकता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
Maharashtra Elections | विधानपरिषदेतच महायुतीत फुट..?; मनसे विरुद्ध भाजप लढतीची घोषणा
मात्र, विधानसभा निवणुकीपूर्वी आघाडीत बिघाडी होईल का..? असे चित्र दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे म्हटलं असून, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांसाठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसत आहे. तर, आता शरद पवार यांच्या नेतृत्त्वात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात जागा लढवणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी जागांचा आकडा काही सांगितला नाही. (Maharashtra Assembly Election 2024)
Maharashtra Assembly Election 2024 | काय म्हणाले जयंत पाटील..?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे म्हणाले की, “आता राज्यात तीन-चार महिन्यांत विधानसभा निवडणुका लागतील. या निवणुकीत आम्ही सर्वच उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मात्र, या आगामी विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतदारसंघात जास्त काही फिरता येईल, असं वाटत नाही. त्यामुळे आता या निवडणुकीत जे काय करायचंय ते तुम्हीच करायचंय. मी जागांचा आकडा सांगितलं. तर लगेच टीव्हीवर सुरू होईल, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी इतक्या जागा मागणार, म्हणून मी आता काही आकडा सांगत नाही. (Maharashtra Assembly Election 2024)
अजित पवार गट एवढ्या जागा लढवणार..?
दरम्यान, दुसरीकडे महायुतीत मात्र तिन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात जागांसाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट आणि शिंदे गटाला कमी जागा मिळाल्याने त्यांचे नेते नाराज आहेत. यातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील. तेवढ्याच जागा आपल्यालाही मिळायला हव्यात. तसेच छगन भुजबळांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ८० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचेही जाहीर केले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम