Ratan Tata | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांनी आपल्या वयाच्या 86 व्या वर्षी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली असून मानवतेचा, विश्वासहार्यतेचा मानबिंदू हरपला अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. आज रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यभरात एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
राज्यात आज दुखवटा जाहीर
राज्यात ज्येष्ठ उद्योगपती, पद्मभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थनार्थ आज गुरुवार दि. 10 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा दुखावटा पाळण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटांना सन्मानपूर्वक निरोप देत श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याचबरोबर, आज मुंबईत होणारे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून हे सर्व कार्यक्रम परवा घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली
आपल्या गौरवास्पद कामगिरीतून जगभरात देशाचा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी आजवर देशावर ओढवलेल्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे केला. हा त्यांचा हा स्वभाव कायम स्मरणात राहील. सामाजिक जाणिवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडविणाऱ्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम