Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर गुप्त भेट?; ‘या’ नेत्याच्या दाव्यानंतर राजकारणात खळबळ

0
37
#image_title

Maharashtra Politics | 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली. शिवसेना-भाजपची महायुती मुख्यमंत्री पदावरून फिसकटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली. त्यानंतर मात्र मागील पाच वर्षात राज्यात अनेक राजकीय भूकंप झाले. त्यातच आत्ता पुन्हा एकदा बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर गुप्त भेट झाली असून या भेटीनंतर उद्धव ठाकरे दिल्लीला देखील गेले.” असा खळबळ जनक दावा केला. त्यानंतर आता राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Politics | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार..?; बघा नेमकं प्रकरण काय?

“ठाकरे-फडणवीसांमध्ये दोन तास चर्चा”

सिद्धार्थ मोकळे यांनी “वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलैला रात्री दोन वाजता 7 डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले व त्यानंतर 5 ऑगस्ट रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर गेले त्यानंतर दोन तास ठाकरे-फबणवीसांमध्ये मातोश्रीवर बैठक झाली. 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले. दिल्लीत जाताना सोबत कोण-कोण होते? दिल्लीत कोणाच्या गाठीभेटी केल्या हे उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावे” असे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, “आम्हाला मिळालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत, या मागचा कारण म्हणजे राज्यातील आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्के माहित आहे. मात्र या आरक्षणवादी मतदारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलट सुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये. यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत.” असे देखील वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.

Maharashtra Politics | राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार.?; काही मंत्र्यांना डच्चू तर, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

2019 नंतरचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा ग्राफ पाहता कधी काय घडेल याची कुणालाच कल्पना नाही. शिवसेना भाजपने 2019 ची विधानसभा निवडणूक एकत्रपणे लढली. मात्र मुख्यमंत्री पदावरून हे दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यातूनच महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात आली. त्यानंतर राज्यातील दोन प्रमुख पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला. मागच्या वेळी भाजपचे 23 तर शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. मात्र यावेळी भाजपचे 9 आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले. तर काँग्रेसची संख्या एक वरून 13 आणि राष्ट्रवादीची संख्या 4 वरून 8 खासदारांवर पोहोचली. त्यामुळे मविचा फायदा उद्धव ठाकरे यांना होण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीलाच झाल्याचे यातून स्पष्ट होते. त्यात वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आलेल्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात पडद्यामागून काही घडतंय का? अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here