Udyog ratna award : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो. याच पार्श्वभूमीवर यावर्षीपासून महाराष्ट्र शासनातर्फे “उद्योग रत्न” पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. तर पहिलाच महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार हा देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे.
टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना हा पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी महाराष्ट्र भूषण च्या धरतीवर उद्योग रत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान सोहळा केला जाणार आहे. असे देखील यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं तर देशातील उद्योग क्षेत्रामध्ये मोठा वाटा असलेल्या सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची यंदाच्या पहिल्याच उद्योग रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असल्याचे गुरुवारी त्यांनी विधान परिषदेमध्ये जाहीर केलं.
https://thepointnow.in/discharge-of-water/
राज्यामध्ये उद्योग उभारणीसाठी आणि गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या परवानग्या या एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक विधान परिषदेमध्ये मांडण्यात आले होते. या विधेयकावरील चर्चे दरम्यान उत्तर देत असताना मागील दहा महिन्यांमध्ये देशात राज्याने मोठी मुसंडी मारली असल्याचा दावा सामंत यांच्याकडून यावेळी करण्यात आला.
उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचं सांगत या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योग मंत्री म्हणून आपला समावेश असलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.(udyog ratna puraskar)
उद्योग रत्न पुरस्कार हा भारतामध्ये बहुप्रतिष्ठेचा मानला जाईल असा पुरस्कार आहे. (Ratan tata)असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान उद्योग रत्न पुरस्कारा सोबतच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकांसाठी(marathi udyojak) देखील पुरस्कार देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र हे पुरस्कार कोणाला देण्यात येतील? या सर्व पुरस्कारांचं स्वरूप नेमकं कसं असेल? आणि हा पुरस्कार प्रदान सोहळा कधी पार पडेल याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाहीये.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम