Raj Thackeray | राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर

0
42
#image_title

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘नवनिर्माण यात्रा’ सुरू असून या यात्रेतचा विदर्भ टप्पा नुकताच पूर्ण झाला. आता या यात्रेचे ‘मिशन उत्तर’ सुरू झाले असून त्यासाठी शनिवार दि. 5 ऑक्टोबर राज ठाकरे नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधील 47 विधानसभा मतदारसंघांचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाणार आहे.

Raj Thackeray | राज ठाकरेंची घोषणा.! महायुतीसोबत काडीमोड; काहीही करून आमदारांना सत्तेत बसवणार

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकी स्वबळावर लढवण्याचे ठरवले असून 288 पैकी 225 ते 250 जागा लढवणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यासाठीच राज्यभरात त्यांची ‘नवनिर्माण यात्रा’ सुरू असून या यात्रेचा विदर्भ टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे व आता उत्तर महाराष्ट्रात यात्रा काढली जाणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नवनिर्माण यात्रेला नाशकातून सुरुवात

उत्तर महाराष्ट्रातील नवनिर्माण यात्रेची सुरुवात नाशिकमधुल दोन दिवसीय दौऱ्याने होत आहे. शनिवारी दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता राज ठाकरेंचे सहकुटुंब ओझर विमानतळावर आगमन होणार असून मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील मनसेचे वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे वनी गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेणार असून पुढे चांडक सर्कल येथे हॉस्पिटल एस.एस.के. येथे ते मुक्कामी असणार आहेत.

विधानसभेसाठी कोणती भूमिका घेणार

तर रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत हॉटेल एस.एस.के. येथे उत्तर महाराष्ट्रातील विधानसभानिहाय आढावा बैठक पार पडणार असून उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक या ठिकाणी येणार आहेत. दरम्यान गेल्या गणेशोत्सवाच्या काळात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार होते. परंतु ठाणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाला झालेला दुखापतीमुळे हा दौरा रद्द झाला होता. दोन दिवस ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र विधानसभा निवडणुकीबाबत ते नेमकी काय भूमिका घेणार याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.

Raj Thackeray | मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार..?; राज ठाकरेंनी जाहीर केलं

मनसे पुन्हा इतिहास रचणार? 

मनसेने स्थापनेनंतर 2007 मध्ये नाशिक शहराची तब्बल 2300 पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर केली होती. त्यावेळी या कार्यकारिणीने मनसेला विजय प्राप्त करून दिला होता. मात्र, नंतर पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडली अन् पक्षाची घडी विस्कटली गेली. आता मात्र शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी तब्बल 2200 पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी तयार केली असून ही कार्यकारणी पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करून देणार का? हा प्रश्न मात्र कायम आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here