Raj Thackeray | ‘मोदी नसते तर, राम मंदिर झाले नसते’; ठाकरेंकडून मोदींवर ‘कौतुकसुमने’..?

0
25
Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray |  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर मनसेला गळती लागली. दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण महायुतीला पाठिंबा का दिला. याबाबत खुलासा केला.

यावेळी ते म्हणाले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले. त्यात राम मंदिराचा हादेखील एक विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर अयोध्येत राम मंदिर झालेच नसते, या शब्दांत राज ठाकरे यांनी मोदींवर कौतुकसुमनांची उधळण केली. नरेंद्र मोदी यांच्या आजपर्यंतच्या धोरणांमुळे आणखी पुढील पाच वर्ष त्यांना संधी देण्यात यावी, असे आपल्याला आणि पक्षाला वाटले. त्यामुळेच मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray)

नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झालेच नसते

देशात अनेक विषय हे प्रलंबित होते. त्यात राम मंदिराचा विषय महत्त्वाचा होता. अखेर आता राम मंदिराचा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी आपले बलिदान दिले आहे. त्यावेळी या कारसेवकांना गोळ्यादेखील घालण्यात आल्या होत्या. त्यावेळी शरयू नदीत त्यांची प्रेतं फेकली होती. राम मंदिरासाठी चाललेले हे इतके दीर्घ काळ चाललेले हे आंदोलन विसरता येणारे नाही. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, तरीही नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर हे पूर्ण झालेच नसते, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray)

Raj Thackeray | राज ठाकरेंसमोर भाजपची अट; मनसेकडे फक्त एक दिवस

Raj Thackeray |  महाराष्ट्रासाठीही अनेक मागण्या

“मी नरेंद्र मोदींच्या अनेक धोरणांचा विरोधही केला. मात्र, त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देणे गरजेचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रासाठीही आपल्या अनेक मागण्या आहेत आणि त्याही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हे काही महत्त्वाचे विषय असून, तेही मार्गी लागतील.(Raj Thackeray)

महायुतीचा प्रचार करणार..?

दरम्यान, यावेळी राज ठाकरे आणि मनसे महायुतीचा प्रचार करणार असून, महायुतीच्या उमेदवारांनी कोणाशी संपर्क साधावा याबाबत यादी दोन ते तीन दिवसांत देणार आहेत. निवडणूकीच्या प्रचार मोहिमेत आमच्या लोकांना सन्मान मिळेल, ही अपेक्षा असून, तुम्ही महायुतीचा प्रचार करावा, असे आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. महायुतीच्या प्रचार सभांना आम्ही संबोधित करायचं की नाही..? याबाबत अद्याप काही ठरवलेलं नाही, असेही राज ठाकरेंनी सांगितले. (Raj Thackeray)

Raj Thackeray | दिल्लीत मोठ्या घडामोडी..!; मनसे-भाजप युती होणार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here