पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या पुणे अपघात प्रकरणी आता स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर आले आहे. नेमके हे प्रकरण काय..? चला बघूयात…
पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्शे गाडीने (Pune Car Accident) आयटी अभियंता असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा दोघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर उपस्थितांनी या गाडीचालकाला चोप देत पोलिसांकडे सोपविले. तर, यात महत्वाचं म्हणजे हा भरधाव गाडी चालवणारा गाडीचालक हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे.
दरम्यान, या अपघातानंतर या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी राजकीय वर्तुळातून प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. तर, या अल्पवयीन आरोपीला अवघ्या १५ तासात जामीन मंजूर झाला आणि त्याला न्यायालयाने ३०० शब्दांचा निबंध लिहण्याची हास्यास्पद शिक्षा सुनावली. यामुळे हे प्रकरण सध्या सोशल मिडियावर चांगलेच पेटले असून, या प्रकरणाला आता राजकीय रंग आला आहे. स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी नेतेही यावरुण मैदानात उतरले आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं हे जाणून घेऊयात…(Pune Car Accident)
Nana Patole Car Accident | नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा दावा..?
Pune Car Accident | नेमकं काय घडलं?
१८ मे रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पुण्यातील कल्याणी नगर येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्शे गाडीने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुण तरुणीला चिरडलं आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गाडीचालक हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा वेंदात अग्रवाल होता.
दोन निष्पापांचा बळी निबंध लिहण्याची शिक्षा
बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे समोर येताच यंत्रणा कामाला लागली आणि अवघ्या १५ तासात जामीन मंजूर झाला. त्याला न्यायालयाने १५ दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत वाहतुकीचे नियोजन करावे लागेल आणि ३०० शब्दांचा वाहतूक नियम आणि आपघातावर निबंध लिहायला सांगितला.(Pune Car Accident)
तसेच मानसोपचार तज्ञांकडून उपचार व भविष्यात अपघात झालेला दिसल्यास अपघातग्रस्ताची मदत करण्याच्या अटी घालत जमीन मंजूर केला. आरोपी हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. असा संशय असल्याने पोलिसांनी त्याची रक्ताची चाचणी केली. मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याला जामीन मिळाला. यानंतर या प्रकरणाचे काही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले. तर, मी दारु पितो आणि वाडिलांनीच आपल्याला गाडी चालवायला दिल्याचे त्याने कबुल केले.
Fatal accident of car container : कार कंटेनरचा भीषण अपघात ; चार जण जागीच ठार, वाहनांचा चुराडा
अजित पवार गटाच्या आमदाराने टाकला पोलिसांवर दबाव..?
तर, या प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचे आरोप केले जात आहे. यात या मुलाचे वडील आणि बिल्डर विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. मात्र, काल छत्रपती सांभाजीनगर येथून त्याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा, याच हॉटेलचे मालक मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार काऊंटर जयेश बोनकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Car Accident)
या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासकार्यावर प्रश्नचिन्ह उठवले जात असून, कॉंग्रेसचे लोकसभा उमेदवार रविंद धंगेकर यांनी या पोलिस ठण्याबाहेर ठिय्या आंदोलनही केले होते. तर, आता या प्रकरणात “राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम