सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाफेड महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील कळवण शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन केदा आहेर यांची मंगळवारी (दि. २१ ) रोजी निवड झाली. या निवडणुकीसाठी राज्यातून तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात केदा आहेर यांचा विजय होऊन त्यांची संचालक पदी निवड झाल्याने देवळ्यात आहेर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.
Deola | केदा आहेरांमुळे पहिल्यांदाच देवळ्याला शेतकरी संघाच्या नेतृत्वाची संधी
केदा आहेर यांनी देवळा ऍग्रोच्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षांपासून शेती संबंधी उद्योगाच्या माध्यमातून आपले कामकाज सुरु केले होते. देवळा ऍग्रोला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी इतर राज्यात ऍग्रो प्रोड्युसरच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवल्याने इतरत्र आहेर यांचे संबंध चांगले प्रस्थापित झाले. याचा फायदा त्यांना ह्या निवडणूकित झाला.
Chandwad | शिवजयंती निमित्त केदा आहेर यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वाटप
यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेत कृषी सभापती म्हणून काम पाहिले आहे. देवळा बाजार समितीचे सभापती ते नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद, भाजपा जिल्हाध्यक्ष, नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख अशी अनेक जिल्हास्तरीय पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांच्या ह्या निवडीने निश्चितच शेतकऱ्याचे हित साधेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम