Pune | लग्नाला नकार दिल्याच्या रागातून १९ वर्षीय (Crime news) तरुणीला रस्त्यात अडवत तिला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यामधून (Pune) समोर आला आहे. पुण्यामधील नाना पेठ ह्या परिसरात ही घटना घडलेली आहे. ह्या प्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune) मुली सुरक्षित आहेत का?, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर झाला आहे.
ही संपूर्ण घटना पाहून तरुणी बिथरली व तिने थेट समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, लग्नासाठी मुलगा मला विचारत होता. पण, संबंधित मुलीने नकार दिल्याने त्यानेहे कृती केल्याचं तिने ह्या तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे ह्या २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी व तक्रारदार मुलगी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर ही ओळख वाढली आणि आरोपीने संबंधित मुलीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मुलीने त्यास लग्नासाठी नकार दिला. याचा राग ह्या आरोपीच्या मनात राहिला. आणि या रागातून ही तरुणी नाना पेठेतून (Pune) जात असताना त्याने तिला अडवलं व तिचा थेट हात पकडला.
Gautam Adani यांची रेकॉर्डब्रेक कमाई; 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
त्यानंतर तरुणीला कॅम्प चौकात (Pune) चलण्यास सांगितले असता तिने स्पष्ट नकार दिल्यामुळे चिडलेल्या आरोपी प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. तसेच “तु माझी झाली नाही तर, कोणाचीच होऊ देणार नाही”, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमुद केलेले आहे.
रागात तरुणीवर हल्ला…
काही दिवसांपूर्वीच पुण्यात (Pune) तरुणी भेटत नसल्याच्या कारणाने रागाच्या भरात तरुणाने तरुणीवर हल्ला करत तिचे डोके फोडल्याचा धक्कादायक प्रकार हा पुण्यातून समोर आला होता. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. यात ३७ वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली होती. कोरेगाव पार्क येथील बर्निग घाट ह्या परिसरात ही घटना घडली होती.
याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. संकेत शहाजी म्हस्के असं ह्या २६ वर्षीय तरुणाचं नाव होतं. आरोपी संकेत व ३७ वर्षीय महिला हे दोघे मित्र होते. दोघेही एकाच परिसरात वास्तव्यास होते. काही दिवसांपासून दोघांत भांडणं सुरू झाल्याने महिला आरोपी सोबत बोलत नव्हती. याचा राग आल्याने संकेतने हा हल्ला केला होता. (Pune)
Mobile offer | १० हजारांच्या आत आला हा जबरदस्त 5G Phone
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम