Skip to content

Nashik Missing Case | नाशिकमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

Sambhaji Nagar

Nashik Missing Case | अंबड औद्योगीक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या भागातील दोन अल्पवयीन मुली रविवार (दि. ०३) पासून बेपत्ता झालेल्या आहेत. त्यां मुलींचे कोणी तरी अपहरण केल्याचा अंदाज कुटुंबीयांनी वर्तविल्याने अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. (Nashik Missing Case)

Mobile offer | १० हजारांच्या आत आला हा जबरदस्त 5G Phone

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे आणि अंबड लिंक रोड भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली रविवारपासून बेपत्ता झाल्या असून घरात काही एक न सांगता त्या मुली निघून गेल्या आहेत. त्यांना कोणी तरी कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबीयांनी वर्तविलेला आहे. (Nashik Missing Case) याबाबत अपहरणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण व सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.

नाशिक (Nashik Missing Case) जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे शहरातून मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. नुकताच राज्यातील मुलींच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर नाशिक शहरात देखील मुलींचे बेपत्ता होणे चिंतेची बाब ठरत आहे.

Gautam Adani यांची रेकॉर्डब्रेक कमाई; 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर

अपहरण वाढण्याची नेमकी कारणं काय?

राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढते असून ही चिंताजनक बाब आहे. त्यानुसार मुली बेपत्ता होण्याची काही कारणे देखील समोर आलेली आहेत. नोकरी, लग्न, कौटुंबिक कलह, सोशल मीडियाचा अतिवापर, प्रियकराकडून लग्नाचे अमिष, विवाहबाह्य संबंध, प्रेमाची आमिष दाखवून मुलींची दिशाभुल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. (Nashik Missing Case)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!