Skip to content

Dhule Crime | चिमुकला भाचा रडत होता; संतापलेल्या मामानेच भाच्याला संपवलं

Dhule Crime

Dhule Crime | मामा-भाच्याचं नातंच वेगळं असतं आणि सगळे लाड पुरवणारा, खेळणी आणून देणारा, भरपूर मस्ती करणारा मामा हा सगळ्याच भाच्यांचा लाडका असतो. मात्र धुळ्यामध्ये याच मामा-भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी आणि हृदयाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडलेली आहे. भाचा सतत रडत होता आणि त्याच्या रडण्याचा त्रास होता म्हणून एका नराधम मामाने अवघ्या 4 वर्षांच्या भाच्याची हत्या केली. हा गंभीर आणि तितकाच हादरवणारा प्रकार धुळ्यात घडल्याचे समोर आलं आहे. (Dhule Crime)

Nashik Missing Case | नाशिकमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संपुर्ण घटना घडली आहे मात्र हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण झाली असून संपूर्ण शहरात खळबळ उडालेली आहे. नूरुल अहमद असे ( वय 22) असे आरोपीचे नाव असून चाळीसगाव रोड पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहे. (Dhule Crime)

निरागस चिमुकला आजोळी आला पण …

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील फिरदोस नगर येथे हा लहान मुलगा त्याच्या आईसोबत आजोळी आला असताना आरोपी नूरुल हा त्याच्या भाच्यासोबत खेळू लागला मात्र काही वेळाने त्याचा भाचा मोठमोठ्याने रडू लागला, काही केल्या भाचा रडायचा थांबेचना. त्याच्या रडण्यामुळे मामा नुरूला याला त्रास होऊ लागला आणि त्याचं डोकंही दुखायला लागलं.

त्याच संतापाच्या भरात त्याने त्याच्या अवघ्या चार वर्षांच्या भाच्याला उचललं आणि शेजारीच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून त्याचा जीव घेतला तसेच थोड्यावेळाने त्या मुलाची आई त्याला शोधत बाहेर आली परंतु मुलगा कुठेच न दिसल्याने तिने शोधाशोध सुरू केली. अखेर तिला तिचा मुलगा शेजारच्या खोलीत असलेल्या ड्रममधील पाण्यात मृतावस्थेत दिसला आणि त्या मातेच्या पायाखालची जमीनच सरकली.

Pune | ‘माझी नाही तर, कोणाचीच होऊ देणार नाही’; भररस्त्यात तरुणीला मारहाण

भाच्याला मारल्याची मामाने दिली कबूली

शोकाकुल आईने जोरात हंबरडा फोडला आणि हे कसं झालं? मुलगा ड्रमच्या पाण्यात कसा गेला? याची नातेवाईकांनी चौकशी केली तेव्हा आरोपी नुरूल याने आपणच संतापाच्या भरात भाच्याला पाण्यात बुडवल्याचे सांगत क्रूर कृत्याची कबुली दिली आहे. त्याच्या बहिणीने लगेचच चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनमध्य धाव घेत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. (Dhule Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!