Mobile offer | १० हजारांच्या आत आला हा जबरदस्त 5G Phone

0
3
mobile offer
mobile offer

Mobile offer |   Redmi 13C 5G हा फोन भारतीय बाजारात दाखल झालेला आहे. ह्या कंपनीनं आपल्या नवीन ’१३सी सीरीज’ ह्या अंतगर्त दोन नवे मोबाइल सादर केलेले आहेत. ज्यात Redmi 13C 4G व Redmi 13C 5G ह्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कमी किंमत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे रेडमीचे हे फोन (mobile offer) कमी बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन ठरणार आहेत. बघूयात ह्या ५जी मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स.

अशी आहे किंमत

Redmi 13C 5G हा फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आलेला आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ही १०,९९९ रुपये अशी आहे. तर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ही १२,४९९ रुपये इतकी आहे. त,र टॉप मॉडेल ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीच्या स्टोरेजसह फक्त १४,४९९ रुपयांत विकत घेता येणार आहे.(mobile offer)

विशेष म्हणजे आयसीआयसीआय बँकच्या कार्डचा वापर केल्यास १,००० रुपयांचा डिस्काउंटदेखील मिळेल. १६ डिसेंबर पासून ह्या फोनची विक्री भारतीय बाजारांत सुरु होणार आहे. तसेच हा Startrail Silver, Startrail Green व Starlight black ह्या कलरमध्ये तुम्हाला विकत घेता येईल.(mobile offer)

Winter Session | हिवाळी अधिवेशनावर धडकणार १०० मोर्चे; सरकारला घाम फुटणार?

असे आहेत स्पेसिफिकेशन्स

Redmi 13C 5G ह्या फोनमध्ये ६.७४ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. वॉटरड्रॉप नॉच ह्या डिजाइनसह येणारा हा फोन १६०० x ७२० पिक्सेल रिजोल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, ६०० नीट्स ब्राइटनेसलादेखील सपोर्ट करतो. ह्या फोनला (mobile offer)कोर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ची सुरक्षाही मिळते.

हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह आलेला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी ५७ एमसी २ जीपीयूही मिळतो. सोबतच, ८जीबी पर्यंत रॅम व २५६जीबी स्टोरेजही दिलेले आहे. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीने रॅम दुप्पटही करता येतो. तसेच १ टीबी पर्यंतच्या मायक्रो एसडी कार्डनेही स्टोरेज वाढवता येईल.(mobile offer)

फोटोग्राफीसाठी Redmi 13C 5G हा ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देखील देण्यात आलेला आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये (mobile offer) ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिलेला आहे.

पावर बॅकअपसाठी यात ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, ती १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi 13C 5G ह्या स्मार्ट फोनमध्ये ७ ५जी बँड्स देण्यात आलेले आहेत. ह्यात Dual SIM, तसेच ब्लूटूथ ५.३, वायफाय ५ यासह ३.५mm जॅकही मिळतो आहे. तर सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक फीचर मिळत आहे.(mobile offer)

Jalgaon | जळगावच्या शिव महापुराण कथेत महिला चोरांचा सुळसुळाट


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here