Skip to content

Winter Session | हिवाळी अधिवेशनावर धडकणार १०० मोर्चे; सरकारला घाम फुटणार?


Winter Session | महायुती सारकरचं यंदाचं हिवाळी अधिवेशन(Winter Session) हे उद्यापासून नागपूरमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार हे सध्या नागपुरात मुक्कामी निघाले आहेत. नागपूरनगरीत उद्यापासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला दमदार सुरुवात होणार आहे.

सध्या राज्यातील प्रश्नांकडे आणि दोन्ही पक्षांकडे बघता हे अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशन काळात विविध आंदोलनंदेखील होत आहेत. जवळपास १०० मोर्चे हे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातच्या ४५ पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगीही देण्यात आलेली आहे. त्यामुळे सभागृह तसेच सभागृहाच्या बाहेरच्याही आंदोलनांनी यंदाचं हे हिवाळी अधिवेशन (Winter Session)चांगलंच गाजणार आहे.

ह्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

उद्यापासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session)अनेक मुद्यांवर चर्चा होणार असून, सध्या राज्याभरात पेटलेला असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा हा यंदाच्या ह्या अधिवेशनात चर्चेचा मोठा विषय ठरू शकतो. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा विरोधक उचलून धरू शकतात. काही दिवसआधीच राज्यात अवकाळी पाऊस आणि गरपीट झालेली असून, त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी ह्या मुद्द्यांवरुन उद्यापासून सभागृहात मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Info-Tech News | SIM कार्डसाठी आधार-पॅनची गरज नाही; १ जानेवारीपासून नियम बदलणार

चहापानाचा कार्यक्रम

काहीच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांचं नागपुर येथे आगमन होईल. दरम्यान, संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहानापाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सरकार वतीने आयोजित ह्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष हजेरी लावणार? की विरोधक यावर बहिष्कार घालणार? हे बघणं महत्वाचं असेल. आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठकदेखील होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

१०० मोर्चे धडकणार

नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न हे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत. दरम्यान, ह्या अधिवेशनावर जवळपास १०० मोर्चे हे धडकणार आहेत. आतापर्यंत ४५ पेक्षा अधिक मोर्च्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. ह्या मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅनदेखील तैनात केलेल्या आहेत. ह्या अधिवेशन काळात पोलीसांचं जेवण, निवास व आरोग्याची उत्तम व्यवस्था असेल, असंही नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

अधिवेशन काळातील सुरक्षा व्यवस्था

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ह्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session)कशी तयारी करण्यात आलेली आहे, याबद्दल माहिती दिली असून, ह्या हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असेल. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेसाठी तब्बल ११ हजार पोलीसांचा फौजफाटा असणार आहे. व्हीआयपी सुरक्षा ही ह्या पोलीसांची प्राथमिकता असेल. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक देखील याठिकाणी २४ तास तैनात असणार आहे, असंही यावेळी अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

Manoj jarange | जरांगे पाटील राजकारणात येणार?; काय म्हणाले रोहित पवार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!