Skip to content

Breaking News | भाजपा खासदारांचे तडकाफडकी राजीनामे

modi-shah

Breaking News | नवी दिल्ली | अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेले आहेत. त्यातील तीन राज्यांमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली असून अन्य दोन राज्यांमध्येही भाजपची कामगिरी चांगली झाली होती. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं 21 खासदारांना तिकिट दिलेलं होतं तसेच यातील 12 खासदार विजयी झाले आहेत. यापैकी 10 जणांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking News)

Info-Tech News | SIM कार्डसाठी आधार-पॅनची गरज नाही; १ जानेवारीपासून नियम बदलणार

मध्य प्रदेशमधील सरकार कायम राखण्यात भाजपने यश मिळवलं आणि त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली. तसेच राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव करुन भाजपनं सत्ता मिळवली आहे तर तेलंगणात भाजपनं कामगिरी सुधारत 8 जागा जिंकल्या. भाजपने या 4 राज्यांमध्ये 21 खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 7  खासदार निवडणुकीच्या आखाड्यात होते. तर छत्तीसगडमध्ये 4, तर तेलंगणात 3 खासदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकिट देण्यात आलेलं होतं.

भाजपच्या 21 पैकी 12 खासदारांनी विधानसभा निवडणूक जिंकली आणि यातील 10 खासदारांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज भेट घेतली आहे. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विजयी खासदार नड्डांसोबत लोकसभा अध्यक्षांकडे पोहोचले आणि त्यांनी राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. यावेळी दोन खासदार मात्र अनुपस्थित होते. बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह अशी त्यांची नावं आहेत तसेच बाबा बालकनाथ राजस्थानच्या अलवरचे खासदार आहेत तर रेणुका सिंह छत्तीसगडच्या सरगुजा मतदारसंघाचं नेतृत्त्व लोकसभेत करतात. (Breaking News)

Manoj jarange | जरांगे पाटील राजकारणात येणार?; काय म्हणाले रोहित पवार

राजीनामा देणारे मध्य प्रदेशातील खासदार कोण?

  • नरेंद्र सिंह तोमर
  • प्रल्हाद सिंह पटेल
  • राकेश सिंह
  • उदय प्रताप
  • रिती पाठक

राजीनामा देणारे छत्तीसगडमधील खासदार कोण?
अरुण साव
गोमती साई

राजीनामा देणारे मध्य राजस्थानातील खासदार कोण?
राजवर्धन सिंह राठोड
दिया कुमारी
किरोडी लाल मीणा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!