Assembly Election Result | नाशिक पश्चिममध्ये सिमा हीरे तर दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ आघाडीवर

0
41
#image_title

Assembly Election Result | विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे इंजिन विजयाच्या दिशेने कूच करत आहे. तर राज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला 127 जागा मिळाल्या असून महायुती 217 जागांवर आघाडीवर आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असून सागर बंगल्यावरती आता हालचालींना सुरुवात झाली आहे.

Malegaon News | काटवन परिसरात भूसेंची जोरदार मुसंडी; विजयाच्या दिशेने वाटचाल

दिंडोरी व नाशिक पश्चिम मतदार संघात युतीची मुसंडी

पंधराव्या फेरीअंति दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांना 66,184 तर सुनीता चोरसकर 39,785 इतकी मते मिळाली असून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ 26,399 मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक पश्चिम मतदार संघात तेराव्या फेरीअंति मनसेच्या दिनकर पाटील यांना 25836, भाजपाच्या सीमा हिरेंना 57952 तर ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांना 31,826 इतकी मते मिळाली असून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे 26,126 मतांनी आघाडीवर आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here