Amit Shah | अमित शहांचे राहुल गांधींना खुले आव्हान; वक्फ कायद्याबाबत केले मोठे विधान

0
16
#image_title

Amit Shah | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेतेमंडळींनी राज्यभरात प्रचार सभांनी धुरळा उडवला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून एकमेकांना आव्हान-प्रति आवाहन दिली जात आहेत. अशातच आज भाजप नेतेनेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आवाहन दिले आहे. धुळे येथे आयोजित प्रचार सभेत त्यांनी राहुल गांधींना खुले आवाहन दिले आहे.

Amit Shah | अमित शहा नाशिक दौऱ्यावर; उत्तर महाराष्ट्रासाठी भाजपाची रणनीती काय?

काय म्हणाले अमित शहा? 

यावेळी बोलताना शहा यांनी, “या देशातील लोक वक्फ कायद्यामुळे त्रस्त असून नुकतेच कर्नाटकात वक्फ बोर्डाने अनेक गावे संपूर्ण वक्फची संपत्ती आहे. असा निर्णय दिला. चारशे वर्षांपूर्वीची जुनी मंदिरं देखील वक्फची संपत्ती झाले, शेतकऱ्यांची शेती ही वक्फची संपत्ती झाली व लोकांची घरे देखील वक्फची संपत्ती झाली? मला सांगा हा वक्फचा कायदा बदलायला हवा की नाही?” असे म्हणत जनतेला सवाल केला.

पुढे बोलत, “आमची बदलायची इच्छा आहे. तसे विधेयक घेऊन आलो आहोत पण हे राहुल गांधी व पवार याला विरोध करत आहेत. मी आज सांगून जात आहे. राहुल गांधी कान उघडे ठेवून ऐका, ‘डंके की चोट पर’ पंतप्रधान मोदी वक्फचा कायदा बदलतील. आता तुम्ही कोणाचीही जमीन कब्जा करू शकणार नाही.” असे म्हणत राहुल गांधींना खुले आव्हान दिले आहे.

Uddhav Thackrey | अमित शाह हा अहमदशहा अब्दालीचा राजकीय वंशज; ठाकरेंची जहरी टिका

तुमची चौथी पिढी देखील मुस्लिमांना आरक्षण देऊ शकणार नाही

तसेच मुस्लिम आरक्षणावरून निशाणा साधत, “काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना हे सर्व उमेदवार भेटले आणि म्हणाले मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवे. बंधू-भगिनींनो जर मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी व ओबीसींच्या आरक्षणातून कापून द्यावे लागेल. आपण मुस्लिम आरक्षणासाठी सहमत आहात का?” असा प्रश्नही जनतेला विचारला. पुढे बोलत, “राहुल गांधींना मी सांगून जात आहे. कान उघडे ठेवून ऐका तुमची चौथी पिढी जरी आली तरी देखील तुम्ही मुस्लिम आरक्षण देऊ शकणार नाही.” असे म्हणत राहुल गांधींवर निशाणा साधला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here