Political News | ‘मराठा आंदोलन मोठं करण्याचं काम शरद पवारांनी केलं’; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच मोठं विधान

0
32
#image_title

Political News | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराने जोर धरला असून महायुती व महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करीत आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे अस्त्र उगारले जात असून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून प्रचाराला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यातच धाराशिव येथील प्रचार सभेत ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून मोठे विधान करण्यात आले आहे.

Political News | नांदगावात राजकारण पेटले; समीर भुजबळांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न!

शरद पवारांनी मराठा आंदोलन मोठे केले

लक्ष्मण हाके तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्याकरिता आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी, “ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार नसेल, तिथे एक वेळ भाजपाला मतदान करू, पण शरद पवारांच्या तुतारीला मत देणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला व त्यांचं आंदोलन मोठं केले.” असे खळबळ जनक विधान ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आले आहे.

Political News | ‘चला जा..नाही देत मत’ म्हणत मतं मागायला गेलेल्या शिंदेंच्या आमदाराच्या पत्नीची हकालपट्टी

“भूषण सिंह होळकर स्क्रिप्टवर नाचणारा बाहुला”

“देवेंद्र फडणवीस फक्त ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध का? देवेंद्र फडणवीस यांच्यातील क्षमता पहा…त्यांनी मराठा समाजातील तरुणांना रोजगार दिले असतील तर त्यांना मुख्यमंत्री व्हायला विरोध का? फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का?” असा सवाल यावेळी उपस्थित केला. पुढे बोलत, होळकरांचे वंशज म्हणून कोणालाही उमेदवारी दिली जाते आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष भूषण सिंह होळकरांची, आमदार रोहित पवार व प्रवीण गायकवाड यांच्या स्क्रिप्टवर चालणारा बाहुला अशी ओळख आहे. राष्ट्रवादी होळकरांचे वंशज अमेरिकेत असून ते आपल्या राजकारणापासून दूर असल्याचे लक्ष्मण हाके यांनी यावेळेस म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here