Political News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “सिंचन घोटाळ्यांच्या कागदपत्रांवर आर. आर. पाटील यांची सही होती, त्यांनी माझा केसाने गळा कापला आहे.” असे कर्तव्य केले होते यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर देत, “इतकी वर्षे ते झोपले होते का?” असा सवाल करत हल्लाबोल केला आहे. “अजित पवारांना हे 2019 च्या निवडणुकीत हे का नाही आठवले?” असे प्रश्न आव्हाडांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
Ajit Pawar | ‘केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव’ म्हणत अजित पवारांचा आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता, आव्हाड नाशिक मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना, “अजित पवारांचा आजकाल देवेंद्र फडणवीसांवर जास्त विश्वास बसू लागला आहे…मंत्रिमंडळात येण्यापूर्वी त्यांचे तोंड बंद करून ठेवले होते का? असा सवाल करत खोचक टोला यावेळी लगावला.
पुढे बोलत, “त्यांच्या मांडीवर बसल्यामुळे ते असे बोलणारच, गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलणे हिंदू धर्मात शोभत नाही, असे म्हणत अजित पवरांना प्रत्युत्तर दिले. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून माझी मंत्र्यांची हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारी वाढली आहे हे सरकारचे अपयश आहे. पोलिसांवर राज्य शासनाचा मोठा असेल त्यांना काम करू दिले जात नाही अक्षय शिंदे प्रकरणातही पोलिसांवर प्रभाव टाकला गेला हे सर्वांना माहीत आहे.” असे देखील ते म्हणाले.
Political News | शेखर पगारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी, सुहास कांदेवर गुन्हा दाखल
लोकसभेतील पराभव सावरण्याचा प्रयत्न
राज्यात लोकप्रिय योजना आणल्या जातात परंतु यामुळे तिजोरी खाली होतं सून पोलिसांनाही वेतन मिळत नाही अशी राज्याची परिस्थिती असल्याचा आरोप आव्हाड्याने यावेळी बोलताना केला निवडणुकीच्या आधी लाडकी बहिणीसारखी योजना आणणे म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभव सावरण्याचा हा प्रयत्न आहे महिलांना लाच देऊन आपला पराभव सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली.
गद्दारीची परंपरा मोडीत काढणार
त्याचबरोबर, “राज्यात सुरू झालेली गद्दारीची परंपरा मोडीत काढणे हा महाराष्ट्राचा धर्म असून याकरिता लोक या निवडणुकीत काम करीत आहेत. सत्ताधारी व पोलिसांची दहशत असून त्या माध्यमातून विरोधी पक्षांना दाबणे, जनतेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आव्हाडांनी सांगितले. महाविकास आघाडीत होत असलेल्या बंडखोरी बाबत विचारण्यात आले असता, त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम