Narhari Zhirwal | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्यांची कामे शेवटच्या टप्प्यात आली आहेत. त्यात भाजपने रविवारी तर काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून काही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नाशिकच्या दिंडोरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर मतदारसंघात व त्यांच्या विरोधकांमध्ये संमिश्र पडसाद उमटले असून त्यामुळे महायुतीत बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत.
Narhari Zhirwal | धनगर आरक्षणाला झिरवाळांचा कडाडून विरोध; धनगर-आदिवासी आरक्षण मुद्दा पुन्हा पेटला
नरहरी झिरवळांच्या अडचणींत वाढ
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अडचणी दूर होण्याचे नाव घेत नसून सुरुवातीला घरातूनच मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी निवडणुकीसाठी उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानंतर आता गोकुळ झिरवाळ शांत होताच, महायुतीतील घटक पक्षातील अन्य इच्छुकांनी बंडाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार झझिरवाळ या सर्व अडचणींवर काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या निवडणुकीत आमदार झिरवाळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार धनराज महाले यांनी बंडाचे संकेत दिले असून माजी आमदार महाले 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर महायुतीचे कार्यकर्ते व समर्थकांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडखोरीच्या मार्गावर?
तर महाविकास आघाडीकडून आमदार झिरवाळयांच्या विरोधात अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून येथे उमेदवार दिला जाणार आहे. सध्या येथे सुशील रामदास चारोस्कर, मधुकर भरसट, संतोष रेहरे आणि प्रा. अशोक बागुल हे चार इच्छुक उमेदवार आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी म्हणून सुशीला चारोस्कर यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे असे झाल्यास निष्ठावंतांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता आहे. चारोस्कर यांना उमेदवारी मिळाल्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष रेहरे बंडखोरी करण्याची चिन्हे आहेत.
Narhari Zhirwal | धनगर आरक्षणाला झिरवाळांचा कडाडून विरोध; धनगर-आदिवासी आरक्षण मुद्दा पुन्हा पेटला
बंडखोरीमुळे मतांची विभागणी होणार?
या परिस्थितीत दिंडोरी मतदार संघातील राजकीय स्थिती विस्कळीत झाली असून बंडखोरी केल्याने नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आव्हान मिळू शकते. तर आता महायुतीकडून देखील त्यांना बंडखोरीचे आव्हान मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या श्रीराम शेटे यांच्या विरोधात सहकार्यात सक्रिय असलेल्या नेत्यांकडून महाले यांना पाठिंबा मिळेल, तसेच बाजार समिती, कादवा साखर कारखाना आणि अन्य सहकारी संस्थांतील 1 गट माजी आमदार महाले यांच्यासह असून या स्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या मतांची विभागणी होऊ शकते. त्यामुळे महायुतीतील बंडखोरी टाळण्यासाठी झिरवाळ वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. दुसरीकडे माजी आमदार महाले यंदा कोणत्याही स्थितीत माघार घेणार नसून त्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार आयात करणार की निष्ठावंतांना संधी देणार. हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम