Nashik News | मालेगाव शहर व परिसरात परतीच्या पावसाने रस्त्यांची चाळन झाली असून महानगरपालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु आठवड्या भरातच मुसळधार पावसाने बुजवलेल्या खड्ड्यातील खडी व डांबर वाहून गेल्याने परतीच्या पावसाने प्रशासनाच्या थातूरमातून कारभारआची पोलखोल केली आहे. दिवाळी जवळ येत असल्याकारणाने येथील दळणवळण वाढले असून ऐन सणासुदीत नागरिकांना पुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
Nashik News | “उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे”-जिल्हाधिकारी जलज शर्मा
पावसामुळे रस्त्याची चाळण
येथील मोसम चौक, रावळगाव नाका, सटाणा नाका, जुने बस स्थानक, जुना फरहान हॉस्पिटल यासह अनेक मार्गावरील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजवण्यात आले होते. परंतु पावसामुळे खड्ड्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली असून शहरातील कॅम्प, म्हाळदे, देरगाव, सोयगाव, नववसाहत इत्यादींसह बहुतांश भागात भुयारी गटाराचे काम सुरू आहे. पावसामुळे काम सुरू असलेल्या भागात चिखल घातला असून नागरिकांना येजा करण्यासाठी देखील जागा नाही.
रस्त्याची कामे रखडल्याने नागरिकांना त्रास
तर पावसामुळे झालेल्या चिखलामुळे वाहणे लांब उभी करावी लागत असून शिवतीर्थपासून उड्डाणपुलापर्यंत बसस्थानकाकडे जाताना रस्त्यावर खड्डे आहेत. या रस्त्याचे काम थांबल्याने नागरिकांना धुळ व खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. रावळगाव नाका ते मोची कॉर्नर तसेच मोची कॉर्नर ते एकात्मता चौकापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून महापालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी नेहमी साचते. त्याचबरोबर, बाजार समितीत ये-जा करताना शेतकऱ्यांसह बाजार घटकांना देखील त्रास सहन करावा लागत असून दरेगाव भागातील नगरजवळील पुलावर मोठा खड्डा पडला आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी वाहन चालकांना खड्डा दिसावा यासाठी या खड्ड्याच्या चारही बाजूंनी लाकडी फलक लावले आहेत. पंजतन चौकाचे देखील काम थांबले असल्यामुळे मुस्लिम बहुल पूर्व भागात रमजानपुरासह झोपडपट्टी मधील कच्चा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
दिवाळसणापूर्वी प्रशासनाने खड्डे बुजवावे अशी मागणी
जुन्या मौसम पुलावरून अनेक अवजड वाहने जात असतात. या पुलावर देखील खड्डे पडल्यामुळे वाहने खड्ड्यात आदळतात. गणेशोत्सव ईद-ए-मिलादुन्नबीच्या सणावेळी लाखो रुपये खर्च करून बुजवलेले खड्डे, अवघ्या आठवड्याभरातच पावसाने पुन्हा वर आल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्याचबरोबर दिवाळसानापूर्वी महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम