Girish Mahajan | भाजपाच्या संकटमोचकांवरच ओढावले संकट; महिला पोलीस अधीक्षकाचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप

0
2
#image_title

Girish Mahajan | विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच, भाजपचे नेते आमदार गिरीश महाजनांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महिला पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यासोबत नवटके यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांचेही नाव घेतले आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाजनांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

Girish Mahajan | नाशिकमध्ये महाजनांवर मोठी जबाबदारी; नाशिकच्या लढतीत दादा गटाची कोंडी..?

पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीत त्रुटी ठेवल्यामुळे गुन्हा दाखल

जळगावातील भालचंद हिराचंद राईसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी नवटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नवटकेंनी दाखल केलेल्या किंमतचे महाजन हे लाभार्थी असल्याचे उघड झाल्याचा दावा केला गेला आहे. तर रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित व्यक्तीवर कारवाई केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल केले असे नवटकेंनी याचिकेमध्ये सांगितले आहे. 2007 मध्ये भाईचंद हिराचंद राय सोनी राज्य पतसंस्थेमध्ये 1 लाख 69 हजार ठेकेदारांच्या 1200 कोटींचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी 2015 मध्ये केंद्र सरकारच्या उपनिबंधकाने जितेंद्र कंधारेंना अवसायक नेमले होते. कंदारे यांनी कर्जाच्या बदल्यात ठेवी एकरूप करण्यात बेकायदा योजना राबवली यामध्ये ठेकेदारांना 30 टक्के मोबदला तर कर्जदार आरोपींना जास्तीचा फायदा करून दिल्याचे उघड झाले होते. याचप्रकरणी, 2020 साली पुण्यातील डेक्कन आळंदी आणि शिक्रापूर येथे तक्रार दाखल झाल्यावर कंदारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

एसआय पथकाची स्थापना

या प्रकरणाचा तपासाकरिता पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली एसआय पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने जळगाव येथे छापे टाकत अनेकांना अटक केली यामध्ये महाजन यांचे निकटवर्ती असलेले जितेंद्र पाटील आणि निलेश झाल्टे यांना अनुक्रमे 50 लाख आणि 70 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यांना महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जमीनदार असून ही कर्ज बुडवण्यात आली. यामध्ये महाजन हे देखील लाभार्थी असल्याचे भाग्यश्री नवटके यांनी म्हटले आहे. 29 जुलै 2022 ला हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यावेळी राज्यात सत्ता बदल झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फक्त आळंदी पोलीस ठाण्यातील तपास हस्तांतरित झाला होता. दरम्यान, राज्यात म्हाडा टीईटी आरोग्य खात्यातील धरण 3 घोटाळ्याप्रकरणी पंकज घोडे या व्यक्तीला अटक केली. मात्र, पंकज घोडेला अटक झाल्यामुळे माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप भाग्यश्री नवटके यांनी केला आहे. त्यावेळी माझी राज्य राखीव पोलीस दलाच्या अधीक्षक म्हणून चंद्रपूर येथे बदली करण्यात आली 3 जानेवारी 2024 ला नव्या महासंचालकांची नियुक्ती झाल्यावर घोटाळ्यातील आरोपींनी माझ्याविरुद्ध कोणी दाखल केले. गुन्हे अन्वेषण विभागाने अहवाल सादर केल्यानंतर त्याची शिफारस करण्यात आली व माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे भाग्यश्री नवटके यांनी याचिकेत म्हटले आहे.

Political News | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादिला मुहुर्त लागला; ‘या’ 7 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब

गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले

“हि पतसंस्था बहुराज्य असल्यामुळे केंद्र सरकारचा निबंध कार्यालय आणि पोलीस महासंचालकांची परवानगी आर्थिक गुन्ह्यासाठी घेण्यात आली नव्हती, मला अडकवण्यासाठी हे षडयंत्र आखण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव न घेता तपास करण्यापेक्षा असते, मी व माझ्या पत्नीने एक रुपया देखील कर्ज घेतले नसून तपास सीबीआय आणि न्यायालयातही हे प्रकरण असल्याने सत्य लवकरच बाहेर येईल.” असे म्हणत महाजनांनी आरोप फेटाळले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here