Deola | प्रा. यशवंत गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

0
78
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | माळवाडी ता. देवळा येथील भूमिपुत्र, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने तशा निवडीचे पत्र शुक्रवार (दि.१८) रोजी त्यांना मिळाले.

Deola | पिंपळगाव जनता विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा

पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून भूमिका सिद्ध केली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. गोसावी यांनी या पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून भूमिका सिद्ध केली. या पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन ही निवड झाली असल्याचे पत्रात म्हटले आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने इतक्या मोठ्या पदावर निवड केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Deola | पिंपळगाव जनता विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

पदाला न्याय मिळवून देणार… 

अनाथ व निराधार मुलांना आर्थिक व शैक्षणिक मदत देत त्यांची कृतिशील समाजसेवा व सामाजिक बांधिलकीही ते जोपासतात. या साऱ्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही जबाबदारी दिली आहे. आपण ती सक्षमतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून या पदाला न्याय देऊ असे प्रा.गोसावी यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here