Shivsena UBT | ठाकरे गटाचे उमेदवार ठरले..?; नाशिक, निफाडमधून यांना उमेदवारी..?

0
97
#image_title

Shivsena UBT | विधानसभा निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू असून बैठकांवर बैठका होत आहेत. काही जागांवरील तिढा सुटला असून अद्याप काही जागांवर बोलणे सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात सर्वच पक्षाचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या संभाव्य 32 उमेदवारांची नावे समोर आली आहेत.

Shivsena UBT | उद्धवसेनेचे 15 आमदार ठरले….?; एबी फॉर्मचे वाटपही झाले.?

ठाकरे गट निवडणुकीत 80 ते 90 जागा लढवणार? 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा लढवण्याची शक्यता असून यातील अर्ध्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि बहुतांश उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिले होते. तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे आवाहनही केले होते. सिल्लोड-सोयगाव मतदार संघात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shivsena UBT MNS Clash | ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनसे-ठाकरे गटाचा राडा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे:

1. वरळी – आदित्य ठाकरे

2. शिवडी (सुधीर साळवी इच्छुक पुनर्विचाराची शक्यता) – अजय चौधरी

3. राजापूर – राजन साळवी

4. कुडाळ – वैभव नाईक

5. बाळापूर – नितीन देशमुख

6. विक्रोळी – सुनील राऊत

7. दिंडोशी – सुनील प्रभू

8. गुहागर – भास्कर जाधव

9. भांडुप पश्चिम – रमेश कोरेगावकर

10. चेंबूर – प्रकाश पातर्फेकर (अनिल पाटणकर इच्छुक पुनर्विचाराची शक्यता)

11. धाराशिव – कैलास पाटील

12. कलिना – संजय पोतनीस

13. कन्नड – उदयसिंग राजपूत

14. परभणी – राहुल पाटील

15. अंधेरी – पूर्व ऋतुजा लटके

16. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई

17. महाड मतदार संघ – स्नेहल जगताप

18. नाशिक – सुधाकर बडगुजर

19. मालेगाव बाह्य – अद्वय हिरे

20. कर्जत मतदारसंघ – नितीन सावंत

21. निफाड – अनिल कदम

22. डोंबिवली – दीपेश म्हात्रे

23. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर

24. उरण – मनोहर भोईर

25. छत्रपती संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी

26. छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे

27. वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी

28. कन्नड मतदारसंघ – उदयसिंग राजपूत

29. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ – सुरेश बनकर

30. सावंतवाडी – राजन तेली

31. सांगोला – दीपक आबा साळुंखे

32. दहीसर – विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here