PM Modi | शिंदे गटाचे आमदार म्हणे, मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास फाशी घेईन

0
13
PM Modi
PM Modi

PM Modi |  काल सत्ता संघर्षाचा निकाल लागला आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण राज्यात विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, एका शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी जाहीर चॅलेंज दिले आहे. “जर, नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले नाहीत. तर, मी भर चौकात फाशी घेईल असे चॅलेंज या पठ्ठयाने केले आहे. (PM Modi)

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एकनाथ शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी हे आगळेवेगळे चॅलेंज घेतले आहे. दारम्यान, आमदार संतोष बांगर हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे वादात असतात. मात्र, आता ह्या विधानामुळे बांगर चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, यावेळी आ. बांगर म्हणाले की, “जर, २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर, मी भर चौकात फाशी घेईल.” असे विधान हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. याआधीही बांगर यांनी असे चॅलेंज दिले होते. त्यावेळीही ते चर्चेत होते. तर, यामुळे सोशल मिडियावर त्यांचे अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. (PM Modi)

PM Modi | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांत ‘मोठे’ बदल

PM Modi | बांगर यांचे मिशी कापण्याचे चॅलेंज – 

याआधीही आमदार बांगर यांनी कळमनुरी बाजार समितीमध्ये आपली सत्ता न आल्यास मिशी कापण्याचे चॅलेंज दिलं होते. मात्र, त्यानंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली होती. त्यावेळी महाविकास आघाडीने येथे १२ जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, बांगर यांच्या या प्रचाराची त्या काळात राज्यभर चांगलीच चर्चा झाली होती. ” पॅनेलच्या १७ पैकी १७ ही जागा निवडून आल्या नाहीत तर मिशीच ठेवणार नाही”, असं त्यावेळी आमदार संतोष बांगर हे म्हणाले होते. (PM Modi)

PM Modi | मोदी नाशकात; काय आहे मोदींच्या ह्या दौऱ्यामागचे ‘गुपित’

संतोष बांगर आणि वाद – 

आमदार संतोष बांगर हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे वादात असतात. दरम्यान, पुढील काही वकतव्यांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

१.  २६ जून २०२२ – शिवसेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांच्या बायकाच आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांची मुले ही अविवाहितच मरतील.  बांगर यांच्या या विधानानंतर वाद झाला होता.

२. १७ जुलै २०२२ – “गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा” या विधानामुळे वादात.

३. १५ ऑगस्ट २०२२ – ‘मध्यान्ह भोजन योजने’तील जेवणाचा पुरवठा करणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण.

४. १४ ऑक्टोबर २०२२ – ‘पिक विमा कंपनी’च्या कार्यालयाची तोडफोड तसेच कृषी अधीक्षकाला शिवीगाळ व धमकावणे.

५. ऑक्टोबर २०२२ – हॉस्पिटलच्या बिलवरून संबंधित डॉक्टरला फोनवर धमकी दिल्याचे ऑडियो क्लिप व्हायरल.

६. ठाकरे गटात असताना नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची धमकी.

७. ४ नोव्हेंबर – मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ केल्याचे आरोप. (PM Modi)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here