PM Modi in Nashik | आई बहिनींवरून शिवीगाळ करू नका – पं. मोदी

0
31
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Modi in Nashik |  आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक येथे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाद्वारे आयोजित ‘२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांचा भव्य रोड शो झाला. या रोड शोमध्ये मुख्यमंत्री शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सामील होते. त्यानंतर मोदींनी रामकुंड आणि काळाराम मंदिर येथे पूजा केली. यानंतर ते सभास्थळी दाखल झाले होते.

या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध राज्याच्या संघ सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात ही ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने झाली. नंतर पंतप्रधान मोंदींसमोर युवांकडून देशभरातील संस्कृती आणि विविध कलांचं सादरीकरण करण्यात आलं. नाशिक ही राज्याची रामभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदिंच्या या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे. (PM Modi in Nashik)

मोदी है तो मुमकीन है…- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

या महोत्सवाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण केले आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत हा आज दहाव्या क्रमांकावरून आता जगातील पाचवी सक्षम अर्थव्यवस्था बनली आहे. आज अनेक राष्ट्रांचे राष्ट्रपती मोदींसोबत सेल्फी काढतात. त्यांच्या पाया पडतात ही देशासाठी गौरवाची बाब आहे. इकडे मोदीजी लक्षद्वीपला गेले आणि तिकडे मालदिवला भूकंप आला. मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशाचा विकास आणखी वेगाने होत आहे. मोदींनी स्वतःचे जीवन देशाच्या विकासासाठी झोकून दिले. मोदींचे आभार हे शब्दात मानता येणार नाहीत. एवढंच बोलेल की “मोदी है तो मुमकीन है..” या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. (PM Modi in Nashik)

PM Modi in Nashik | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, देवळ्यातील आंदोलक ताब्यात

PM Modi in Nashik | वीर भूमीत येण्याची संधी हे माझे भाग्य – पंतप्रधान मोदी 

महाराष्ट्रात येण्याची आणि जिजाउंना नमन करण्याची तसेच नाशिकच्या काळाराम मंदिरात येण्याची आणि साफसफाई करण्याची मला संधी मिला दिल्याबद्दल मी आभारी. २२ जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरात स्वच्छता मोहीम राबवा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी युवांना केले. तसेच आजचा दिवस हा ‘युवा शक्तीचा दिवस’. आताची पिढी ही सर्वात भाग्यशाली पिढी आहे. माझा सर्वात जास्त विश्वास हा तुमच्यावर आहे. इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. आमच्या सरकारने १० वर्ष युवांना मोकळे आभाळ देण्याचा प्रयत्न केला.(PM Modi in Nashik)

PM Modi in Nashik | नाशकात ‘मोदी उत्सव’; यामुळे नाशिकच्या विकासाचा वनवास संपणार?

गेल्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने तीन पटीने जास्त काम केले. भारतातील विमानतळे ही जगातील इतर विमान तळांइतकीच सक्षम आहेत. भारताचं यश जग बघत आहे. आता आपल्याला भारताला ‘तिसरी’ सक्षम अर्थव्यवस्था बनवायचे आहे. तसेच, “युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं. ड्रग्स आणि नशेपासून दूर रहा. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचा वापर करा आणि आई – बहिणीवरून अपशब्द वापरू नका ते थांबवा”, असे आवाहन युवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दरम्यान, यावेळी कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरिश महाजन, यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित होते. (PM Modi in Nashik)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here