Petrol Breaking | वाहनचालकांनो पेट्रोल-डिझेल आताच भरा नाहीतर…!

0
20
Big Breaking
Big Breaking

Petrol Breaking | तुम्ही जर पेट्रोलची गाडी वापरत असाल तर आताच पेट्रोल-डिझेल भरुन घ्या. कारण राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. महाराष्ट्रतील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलेला आहे. यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार आहे.

Latur Crime | जिगरी मित्रच निघाला आईचा प्रियकर; म्हणुन झोपेतच संपवले

भारतात केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात असून या कायद्यास देशभरातील पेट्रोल ट्रक चालकांनी विरोध केलेला आहे. यामुळे देशभरातील ट्रकचालक आजपासून संपावर गेले असून या संपात महाराष्ट्रातील टँकरचालक सहभागी झाले आहेत. आज ऐन नववर्षाच्या पाहिल्या दिवशी पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवस असणाऱ्या या संपामुळे नाशिकमधील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे.

Trimbakeshwar | नववर्षात नाशिककर त्र्यंबकरायाच्या चरणी लीन; मात्र भाविकांमधून नाराजीचा सूर

Petrol Breaking | संपामागील कारण काय?

भारतात केंद्र सरकार नवीन कायदा आणत असून या नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार आहे. या कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली असून सात लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. यामुळे नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केलेला.

 

वाहन कायद्यात केलेल्या ह्या बदलामुळे राज्यातील ट्रक चालक आक्रमक झाले असून हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. देशभरात विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले तर नाशिकच्या मनमाड डेपोतून एकही टँकर बाहेर पडले नाही आणि यामुळे मनमाड डेपोतून इंधन वाहतूक ठप्प झालेली आहे. पेट्रोल टँकर चालकांचा हा संप मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

सर्व नागरिकांची यामुळे गैरसोय होणार

अचानक पुकारलेल्या या संपामुळे ऐन नववर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या संपामुळे रोज वाहनांनी प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थी अशा सर्व नागरिकांची यामुळे गैरसोय होणार आहे. पेट्रोल पंपावर या संपाबाबत विचारणा केली असता त्यांनाही याबाबत पूर्ण कल्पना नसल्याचं चित्र आता दिसत आहे. यामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्य नोकरदार वर्गाची नववर्षाची सुरुवात चिंतेने झाली आहे. – विजय गायकवाड (वाहन चालक)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here