Skip to content

Pune | पैसे मागितल्याने बहिणीला मारहाण; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल

Pune

Pune |  आई वाडिलांनंतर भाऊ हाच मुलीचा पाठीराखा असतो तिचा आधार असतो. मात्र, याच पाठीराख्यामुळे एका बहिणीवर आयुष्य संपवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, ही धक्कादायक घटना पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी, सख्ख्या भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने आत्महत्या केली आहे. तिने भावाला उधार दिलेले पैसे परत मागितल्यामुळे आरोपी भावासह त्याच्या पत्नीने पीडित बहिणीचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला आहे. दरम्यान, क्रूर भावाच्या याच छळाला कंटाळून वैतागलेयल्या बहिणीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. आता या प्रकरणी वाकड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मयत बहिणीचे नाव हे सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड असे आहे.(Pune)

Pune News | काय सांगता..! ६१ लाखांची मटणाची उधारी

दरम्यान, मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत सुनिता व रामेश्वर यांचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला होता आणि त्यांना दोन मुलेदेखील असून, ते दोघे मजुरी करतात. दरम्यान, मृत बहीण सुनीता हीने आपल्या भावाला दोन लाख रुपये उधार स्वरूपात दिले होते. पण त्याला दिलेल्या मुदतीत त्याने उधार घेतलेले पैसे न दिल्याने ते पैसे परत घेण्यासाठी ३ डिसेंबर रोजी त्या आरोपी भावाच्या घरी आल्या होत्या. मात्र, त्यांचे पैसे तर दिले नाहीच पण, याउलट त्यांना शिवीगाळ करत घरातून हाकलवून दिले. (Pune)

Pune Crime | भाडेकरुनेच केला घात; ६ वर्षे अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

Pune | भाऊ भावजाईच्या छळामुळे आत्महत्या…

आरोपी भावजाईने मारहाण केल्यानंतरहि त्या दिवशी रात्री पुन्हा मृत सुनिता यांच्या भावाच्या पत्नीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना बेदम मारहाण केली. तसेच या प्रकरणी ४ डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी सुनीता या एका सोसायटीत घरकाम करण्यासाठी गेल्या असता, काम झाल्यावर घरी परतताना त्यांना त्यांचा भाऊ संदीप व त्याची पत्नी यांनी पोलिसांत तक्रार केली म्हणून पुन्हा मारहाण करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सख्ख्या भावाच्याच या अमानुष छळाला कंटाळून सुनिता यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार त्यांचे पती रामेश्वर यांनी वाकड पोलिसांकडे केली आहे. (Pune)

५ डिसेंबर रोजी आरोपी भावाने व त्याच्या पतीने सुनीता यांना मारहाण केल्यानंतर दूसरा दिवशी सुनीता या सकाळी दहा वाजता ताथवडे परिसरात बेशुद्ध असलेल्या अवस्थेत आढळून आल्या. दरम्यान, यानंतर त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!