Skip to content

पेट्रोल डिझेल महागणार; पहा आपल्या राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर


महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर डायनॅमिक इंधन प्रणालीवर आधारित आहेत. त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. सोमवारीही तेल कंपन्यांनी दरात कोणताही बदल केला नाही. पेट्रोल-डिझेलच्या होणार या दरवाढीने नागरिकांना फटका बसत आहे.तेल कंपन्यांनी ६ एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ केली .

गेल्या १४ दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी महागले आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे देशात महागाईचा भडका उडाल्याचे दिसले.कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असतानाच पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलरच्या वर राहिल्यास त्याचा भार सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून उचलावा लागेल. डॉलर मध्ये वाढ झाल्यास पेट्रोल डिझेलच्या दरात देखील वाढ होईल.

पाच राज्यांतील निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी अनेक महिने तेलाच्या किमती स्थिर होत्या.आज दिल्लीत १ लिटर पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये आणि १ लिटर डिझेलची किंमत ९६.९७ रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी १०४.७७ रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबई शहर   १२०.५१   १०४.७७

नागपूर        १२०.१०६  १०२.९०

नांदेड          १२२.५६      १०५.२०

नंदुरबार        १२१.३२      १०३.९९

नाशिक          १२०.८३.     १०३.५१

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!