अमरावतीचे खासदार नवनीत आणि रवी राणा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. राणा हे दांपत्य आज राजधानी नवी दिल्लीला जाऊन ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
राणा दांम्पत्यांच्ये दिल्ली प्रवासाचे नियोजन चालले आहे, महाराष्ट्रात राज्य सरकारने अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिली असून ठाकरे सरकारविरुद्ध तक्रार करणार असल्याचं नवनीत राणांनी इशारा दिला आहे. राणा दांपत्य दुपारी 2.00 वाजता मुंबईतून निघून सायंकाळी दिल्लीत पोहोचण्याचे नियोजन करत आहे.
राणा दांम्पत्याला कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचे प्रयत्न ठाकरे – पवार सरकारचे सुरू आहे. राणा यांनी सरकारला इशारा दिला असून म्हणाल्या, आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही. दिल्लीत जाऊन प्रमुख नेत्यांची संवाद साधणार आहोत. तसेच अजित पवारांना सर्व माहिती घ्यावी व नंतरच बोलावे. ठाकरेंविरोधात बोलले की आमच्या घरांवर कारवाई केली जाते. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतिकतेच्या बाता करू नये, असे यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम