Nashik | मनमाड रेल्वे स्टेशन महामार्गावरील ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला

0
12

Nashik |  नाशिकच्या मनमाड रेल्वे स्टेशन येथून जाणाऱ्या इंदुर-पुणे ह्या महामार्गावरील ब्रिटीशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग आज पहाटेच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे इंदूर-पुणे ह्या महामार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे.

दरम्यान, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान ह्या पुलाचा पूर्वेकडे असलेला काही भाग हा सुरक्षा कठड्यासह कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी कुठल्याही प्रकारची वाहने पुलावर नसल्याने यावेळी मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, ह्या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक ही येवला येथून वळविण्यात आली आहे. तर इंदूकडून येणारी वाहने ही मालेगाव येथून वळविण्यात आली आहे.

Milk protest | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे मैदानात

त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक ही विंचूर प्रकाशा या महामार्गावरून वळविल्याने लासलगाव-विंचूर ह्या मार्गावर वाहतूक वाढल्याने या येथील दोन्ही बाजूकडील वाहतूक ही संथ गतीने सुरू असून, वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

दरम्यान, येथील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव आणि विंचूर येथील पोलिसांची संख्या ही वाढवली आहे. ह्या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, वाहतूक विस्कळित झाली असून,  लवकर ह्या पुलाची दुरुस्ती केली जावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Infotech news | स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त सॅमसंगचा नवा कोरा अँड्रॉइड टॅब


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here