Pankaj Bhujbal | लोकसभा, राज्यसभेला नाकारलं पण पुत्राला संधी दिली; दादांनी भुजबळांची मनधरणी केली..?

0
60
#image_title

Pankaj Bhujbal | विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 7 उमेदवारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी मिळाली असून, छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची हुकलेली संधी मुलगा पंकज भुजबळ यांनी विधानपरिषदेत मिळवली आहे.

Chagan Bhujabal | छगन भुजबळांचे भावनिक आवाहन; ही निवृत्तीची घोषणा की विधानसभेसाठी नवा डाव…?

राष्ट्रवादी काँग्रेस तिकिटावर दोन वेळा विधानसभा लढवली

पंकज भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, नांदगावमधून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 2 वेळा विधानसभेवर गेले. पहिल्यांदाच ते विधान परिषद आमदार झाले असून आज मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी पुत्राला आमदारकी मिळाल्याने भुजबळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पंकज भुजबळ यांना ही संधी दिल्याबद्दल छगन भुजबळ यांचे आभार मानले.

Chagan Bhujabal | कांदे-भुजबळ वाद पुन्हा पेटणार….?; भुजबळांच्या पोस्टने भुवया उंचावल्या

विधान परिषदेच्या 7 सदस्यांनी घेतली शपथ

“येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व सर्वसामान्यांच्या हितासाठी झोकून काम करतील असा विश्वास असल्याचे, भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, भुजबळ समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या विधान परिषदेच्या 7 सदस्यांनी आज विधान भवनात शपथ घेतली असून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली. यामध्ये भाजपकडून चित्रा वाघ, बाबूसिंग महाराज राठोड, विक्रांत पाटील यांना संधी मिळाली असून शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील व माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून पंकज छगन भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांनी शपथ घेतली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here