Deola | व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

0
44
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या विभागस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज संघांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत एस.के.डी. चारिटेबल ट्रस्ट नाशिक, संचलित भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या चौदा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या संघाने नाशिकच्या गुरुगोविंद सिंग स्कूल संघाच्या विरुद्ध चुरशीच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दणदणीत विजय मिळवला.

Deola | देवळा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

व्ही.के.डी. स्कूलचा संघ राज्यस्तरीयसाठी पात्र

व्ही.के.डी. स्कूलचा संघ थेट राज्यस्तरासाठी पात्र ठरला. यात दिव्यानी वाघ, अनिषा मोरे,खुशाली कापडणीस, ईश्वरी काकुळते, समृद्धी देवरे, तन्वी देवरे, गुंजन पगार, प्रियंका बच्छाव, ग्रीष्मा पगार, नूतन शिरसाठ या खेळाडूंचे व विजयी झालेल्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, विद्यालयाचे प्राचार्य एन. के. वाघ, प्राचार्य एस.एन.पाटील यांनी अभिनंदन केले. विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यज्ञेश आहेर, निलेश भालेराव यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास, बबलू देवरे, हेमंत शिंदे यांनी विजयी संघाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here