Opinion Poll | उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?

0
37
Opinion Poll
Opinion Poll

Opinion Poll | सध्या राज्यासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांचीच हवा असून, जिथे तिथे उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवले आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आला असून, याद्वारे मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, या पोलनुसार राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचे दिसत आहे. उत्तर महाराष्ट्राच्या मतदारांचा कौल कोणाला असेल..? हे जाणून घेऊयात. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण आठ जागा असून, या पोलनुसार यापैकी भाजपला पाच जागा, ठाकरे गटाला एक आणि शरद पवार गटाला एक जागा मिळू शकते. (Opinion Poll)

नाशिकचा बालेकिल्ला महायुतीकडेच 

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले असून, दुसरीकडे महायुतीकडून मात्र, अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार या जागेवर महायुतीचाच उमेदवार निवडून येऊ शकतो. (Opinion Poll)

election poll: कसबा, चिंचवड भाजपाच्या हातातून जाणार ? चिंचवडमध्ये ४१ टक्के, कसबा मतदारसंघात ४५ टक्के मतदान

धुळे आणि नंदुरबारचे मैदान कोण मारणार..?

महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाच हॅटट्रिक करण्याची संधी दिली आहे. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेसने महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना मैदानात उतरवले आहे. तर, वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली असून, धुळे लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे.(Opinion Poll)

दरम्यान, एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार धुळे लोकसभा मतदार संघात डॉ. सुभाष भामरे यांचाच विजय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. हिना गावित आणि गोवाल पाडवी यांच्यात लढत होणार असून, यात पुन्हा एकदा डॉ. हिना गावित या बाजी मारू शकतात.

Opinion Poll | जळगावमध्ये भाजप बाजी मारणार   

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून, यामुळे इकडे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेल्या उन्मेष पाटलांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर स्मिता वाघ यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून परोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार या दोघांच्या लढतीत स्मिता वाघ बाजी मारू शकतात. (Opinion Poll)

Maharashtra politics | शपथ घेण्यापूर्वी मी दोन तास प्रॅक्टीस केली – डॉ. भारती पवार

रावेर, दिंडोरीत मतदारांचा कौल कोणाकडे..?

रावेर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा दोन्ही विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि भारती पवार यांना संधी दिली आहे. तर, रावेरमधून शरद पवार गटाकडून रक्षा खडसे यांच्या विरोधात उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. (Opinion Poll)

यात रक्षा खडसे बाजी मारण्याची शक्यता आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, येथेही पुन्हा भारती पवारच निवडणून येतील असा एबीपी माझाच्या ओपिनियन पोलचा अंदाज आहे.

अहमदनगरमध्ये निलेश लंके..? 

अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात शरद पवारांनी निलेश लंकेंना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नगरमध्ये सुजय विखे विरुध्द निलेश लंके यांच्या लढतीत निलेश लंके आघाडीवर असून, ओपिनियन पोलनुसार मतदारांचा कौल नीलेश लंकेंच्या बाजूने आहे. (Opinion Poll)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here