Skip to content

Horoscope 17 April 2024 | ‘रामनवमी’चा दिवस कसा असेल; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope 9 May 2024

Horoscope 17 April 2024 |  पंचांगानुसार, आज 17 एप्रिल 2024 बुधवारचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. आज ग्रहांनी तयार केलेल्या वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, या योगांचे सहकार्य लाभेल. आज शुभ कार्यासाठी दोन मुहूर्त आहेत. ते लक्षात घ्या. सकाळी 07.00 ते 09:00 पर्यंत आणि संध्याकाळी 5.15 ते 6.15 पर्यंत आहे. तर, दुपारी 12:00 ते 01:30 पर्यंत राहुकाळ असेल. आजचा दिवस सर्व राशींसाठी कसा असेल..? वाचा आजचे राशीभविष्य-

मेष राशी –

व्यावसायिकांना आज त्यांच्या निष्काळजीपणामुळे व्यवसायात तोटा सहन करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी असभ्य वर्तवणुकीमुळे वारिष्ठांकडून चेतावणी मिळू शकते. आपल्या वर्तवणुकीत सुधारणा करा. आगामी काळात तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेचच निराश होऊ नका. कुटुंबात आज आनंदाचे वातावरण असेल. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी सामाजिक स्तरावर प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून आपले विचार मांडावेत. आज तुमच्या प्रेम संबंधांत किंवा वैवाहिक जीवनात काही गैरसमजांमुळे वाद होऊ शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, खाण्याच्या सवयी बदलण्याची गरज आहे. (Horoscope 17 April 2024)

वृषभ राशी –

व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास त्यांच्या व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. व्यवसायासाठी नवीन उपकरणे खरेदी करायचे असल्यास त्यासाठी शुभ वेळ सकाळी 7:00 ते 9:00 आणि संध्याकाळी 5:15 ते 6:15 अशी आहे. नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे तुमचे कौतुक होईल.

कुटुंबात काही समस्या उद्भवतील, ज्यामुळे तुमची मानसिक शांतता भंग होऊ शकते. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्ही चिंताग्रस्त असाल. वाहन जपून चालवावे. निष्काळजीपणामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनातील आजचा दिवस आनंददायी असेल. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज समाज माध्यमांद्वारे लोकांचा पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमची मतं सोशल मिडियावर मांडावी. (Horoscope 17 April 2024)

मिथुन राशी –

इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाशी संबंधित लोकांच्या व्यवसायात आज काही समस्या येऊ शकतात. नोकरदार वर्गाच्या लोकांची कामाच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची आज एखाद्या सामाजिक कार्यक्रमात एखाद्या विद्वानांसोबत भेटू शकते. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात तुम्हाला गरजेनुसार काही बदल करावे लागतील. तुम्ही कुटुंबाला पूर्ण वेळ देणे गरजेचे आहे. नवीन खरेदी किंवा त्या संबंधित काही काम असल्यास त्यासाठी आजचा आजचा दिवस योग्य आहे. आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात.

Horoscope 17 April 2024 | कर्क राशी –

व्यावसायिक आज आपल्या बुद्धिमत्तेने आणि कल्पकतेने आपला व्यवसाय यशस्वी करतील. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे यश मिळेल. नोकरदार लोकांनी कामाच्या बाबतीत खूप सतर्क राहून काम केले पाहिजे. कामात हलगर्जीपणामुळे तुमच्या बॉसला राग येऊ शकतो. आज कुटुंबातील मतभेद मिटतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुम्ही आज चिंतेत असाल. छातीत दुखण्याच्या समस्येमुळे तुम्ही आज त्रस्त असाल. देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करा. यामुळे तुम्हाला जुन्या समस्यांपासून दिलासा मिळण्यास मदत होईल. (Horoscope 17 April 2024)

सिंह राशी –

मनुष्यबळ आणि आर्थिक समस्यांमुळे तुमच्या व्यवसायाची वाढ कमी होईल. व्यावसायिकांना आज आर्थिक व्यवहारात नुकसान होऊ शकते. नोकरदार वर्गाच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी टीम लीडरशी वाद होऊ शकतात. अतिआत्मविश्वासामुळे आज तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शक्यतो आज मोठी जबाबदारी घेणे टाळावे. आज तुमच्या प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात तणावाची परिस्थिती असू शकते. कुटुंबात वाद निर्माण होईल मात्र, तुमच्या मध्यस्थीने तो वाद मिटेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी काहीही बोलण्यापूर्वी विचार करूनच बोलायला हवे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला अंगदुखीची समस्या जाणवू शकते.  (Horoscope 17 April 2024)

कन्या राशी – 

शूल योगामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. मोठे प्रकल्पही मिळू शकतात. नोकरदार वर्गाच्या लोकांनाही त्यांच्या आजपर्यंतच्या मेहनतीचा फायदा होईल. मात्र, त्यासाठी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागू शकते. कुटुंबात आध्यात्मिक कार्यक्रम होतील. जोडीदारासोबत आजचा दिवस मजेत जाईल. संध्याकाळी कुटुंबियांसोबत आनंदाचे वातावरण असेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, लठ्ठपणाबद्दल सावध रहा व आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे. (Horoscope 17 April 2024)

Horoscope 14 April 2024 | आजचा दिवस आर्थिक फायद्याचा; वाचा आजचे राशिभविष्य

तूळ राशी – 

व्यावसायिकांना आज आपल्या व्यवसायात नफा मिळेल. ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता कमी होईल. नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. कुटुंबात वाद होतील. त्यावेळी रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन आनंदात जाईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज दात आणि तोंडाच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होईल, थंड, गरम आणि आंबट पदार्थ खाणे टाळा. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे सामाजिक स्तरावर केलेल्या कामामुळे कौतुक होईल.  (Horoscope 17 April 2024)

वृश्चिक राशी –

शूल योगामुळे व्यवसायात नवीन प्रकल्प मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्यांनी कामासाठीचा वेग वाढवावा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, छातीत दुखण्याच्या समस्या जाणवू शकतात. फास्ट फूडपासून खाणे टाळा. आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनातील वाद मिटतील. तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीचे सहकार्य मिळेल जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.  (Horoscope 17 April 2024)

धनु राशी –

व्यावसायिकांना व्यवसायातील नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांची चिंता वाढेल. व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे मोठे नुकसानही होऊ शकते. नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी विरोधकांकडून होणाऱ्या कुजबुजांमुळे वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

आज तुम्हाला तुमच्या मतांवर ठाम राहून काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, त्वचेशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात. आज तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेम समबंध आणि वैवाहिक जीवनात काही वाईट प्रसंग येऊ शकतात. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची आज त्यांच्या विरोधकांकडून प्रतिमा खराब केली जाऊ शकते.  (Horoscope 17 April 2024)

मकर राशी –

बाजारात अचानक हॉट असलेल्या बदलांमुळे व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीमुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी देतील. आज तुमची स्थिती काहीशी गुंतगुंतीची असेल. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज सामाजिक स्तरावर कामाला वेग मिळेल. प्रेम संबंध आणि जोडीदारासाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेण्याची गरज आहे. (Horoscope 17 April 2024)

Horoscope 13 April 2024 | आजचा दिवस कसोटीचा; वाचा आजचे राशीभविष्य

कुंभ राशी –

भागीदारी व्यवसाया करणाऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. शूल योग तयार झाल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीची आज प्रगती होऊ शकते. ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करा, यामुळे तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नतीही होऊ शकते. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, जास्त शारीरिक कसरत केल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची आज समाजात प्रतिष्ठा वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुम्हाला काही बदलांना सामोरे जावे लागेल. आज तुम्ही पिकनिक स्पॉटवर जाण्याचा विचार करू शकता.(Horoscope 17 April 2024)

मीन राशी –

व्यावसायिक समस्या सोडवण्यात काही प्रमाणात यश मिळेल. त्यामुळे तुमचा ताण कमी होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या संदर्भात जास्तच धावपळ करावी लागेल. मात्र, त्यापासून दूर जाऊ नका. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची राजकीय पातळीवर मोठा वाद मिटवण्यात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल.

कुटुंबासोबत दिवस आनंदात घालवता येईल. आज शब्दांवर नियंत्रण ठेवा. वाद ओढावून घेऊ नका. तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा एकमेकांशी बोला आणि एकमेकांना समजून घ्या.  (Horoscope 17 April 2024)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!