Bharati Pawar | भाजपा खासदार डॉ. भारती पवार यांना गावबंदी

0
27
Bharati Pawar
Bharati Pawar

Bharati Pawar |  यंदा पावसाने दडी मारल्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडले होते. यानंतर जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पीक घेतले. तर, त्यातही केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली असून, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याबाबत विरोध दर्शवत काल देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी गावात बॅनर लावत लोकप्रतिनिधींना विरोध दर्शविला होता. आता यानंतर गावकऱ्यांनी खासदार भारती पवार यांना गावबंदी केली आहे. (Bharati Pawar)

काही दिवसांपूर्वी आर्थिक अडचणीत सापडलेल्या माळवाडी येथील ग्रामस्थांनी गाव विक्रीसाठी काढले होते. संपुर्ण राज्याने याची दखल घेतली. परंतु स्थानिक खासदार डॉ. भारती पवार यांनी गावाला भेट देऊन साधी शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा त्यांची भूमिकाही समजून घेणे गरजेचे समजले नाही. यामुळे ज्या लोकप्रतिनिधींना आमच्या शेतकऱ्यांची आवश्यकता नाही. आम्हाला सुध्दा त्यांची गरज नाही. त्यामुळे कृपया त्यांनी आमच्या माळवाडी गावात मतदान मागायला येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत गावकऱ्यांनी सर्वानुमते लोकप्रतिनिधींना गावबंदि करण्याचा ठराव मंजूर केला आहे. (Bharati Pawar)

Dr bharti pawar: मंत्री ‘लेक’ विसरली माहेरचा विकास, श्रीरामपूरच्या नागरिकांचा डॉ. भारती पवार यांच्यावर आसूड

शेतकऱ्यांच्या रोषाची ही तर सुरुवात.. 

गेल्या ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे शेतकऱ्यांचा लाल कांद्याचा उत्पादन खर्चही निघाला नाही. तर, ३१ मार्च रोजी ही कांदा निर्यात बंदी उठवली जाईल. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे निदान उन्हाळ कांद्याला तरी भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या याही अपेक्षांवर सरकारने पाणी फेरले आणि कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक असून, शेतकऱ्यांच्या या रोषाला उमेदवारांना निवडणुकीच्या काळात सामोरे जावे लागेल. यात काहीच शंका नव्हती आणि याची सुरुवात देवळा तालुक्यातील माळवाडी या गावातून झाल्याचे दिसत आहे. (Bharati Pawar)

Onion News | भारती पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; शेतकऱ्यांची मागणी

Bharati Pawar | काय आहे ठराव..?

मागील अनेक दिवसांपासून माळवाडी गावातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट आहे आणि अशा वेळी निर्यातबंदी सारखे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून लादले जात आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. म्हणून काही दिवसांपुर्वी माळवाडी येथील ग्रामस्थांनी ‘गाव विक्रीसाठी काढले’ होते. त्याची संपुर्ण राज्याने दखल घेतली. परंतु स्थानिक खासदार यांनी साधी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांची भूमिकाही समजून घेतली नाही.

त्यामुळे माळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही ठराव करत आहोत. ज्या लोकप्रतिनिधींना आमची आवश्यकता नाही. आम्हाला सुध्दा त्यांची गरज नाही. त्यामुळे कृपया त्यांनी आमच्या माळवाडी गावात मतदान मागायला गावात येऊ नये, असे या ठरावात नमूद करण्यात आल्याचे एक कथित पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आचारसंहितेच्या काळात ग्रामसभा होऊ शकत नाही. मग हा ठराव कसा झाला..? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (Bharati Pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here