वनप्लस कंपनीने फोल्ड स्मार्टफोन रेंजमध्ये पदार्पण केलेलं आहे. या कंपनीचा नवीन डिवाइस OnePlus Open नावाने भारतासह जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा वनप्लस कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे. या कंपनीने फोनमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत. ज्यात 16 GB रॅम+ 512 GB स्टोरेज, स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप तसेच ड्युअल सेल बॅटरीचा समावेश आहे.
OnePlus Open चे स्पेसिफिकेशन्सOnePlus Open च्या Back Pannel वर एक सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यात Triple rear camera setup आणि Hasselblad ब्रँडिंग आहे. या डिवाइसच्या डावीकडे एलइडी फ्लॅश आहे. ह्याचे डायमेंशन अनफोल्ड झाल्यावर 153.4mm x 143.1mm x 5.8 mm आणि वजन 239 GRAM आहे. वनप्लसच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 7.82 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तर सेकंडरी डिस्प्लेची साइज 6.3 इंच आहे. दोन्ही स्क्रीन 120 हर्टझ रिफ्रेश रेट आणि 2440×2268 पिक्सल २के रिजोल्यूशनला सपोर्ट करत आहेत. OnePlus Open मध्ये अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन ओएस 13.2 वर आहे.
फ्लॅगशिप परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट वापर करण्यात आलेला आहे. हा चिपसेट 3.36 गिगाहर्ट्झ क्लॉक स्पीड आणि 4 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो 740 जीपीयू देण्यात आला आहे. डाटा स्टोर करण्यासाठी वनप्लस ओपनमध्ये ब्रँडनं 16 जीबी पर्यंत एलपीपीडीडीआर 5 एक्स रॅम आणि 512 GB पर्यंत यूएफएस 4.0 इंटरनल स्टोरेज आहे. तसेच रॅम वीटा टेक्नॉलॉजीच्या मदतीने 12 GB पर्यंत अतिरिक्त रॅम मिळतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम