द्वारका चौकात धावत्या ओम्नी गाडीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

0
11

नाशिक – शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या द्वारका चौकात आज दुपारच्या सुमारास एका ओम्नी गाडीने अचानक पेट घेतला होता. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आता आलेल्या माहितीनुसार, सदर ओम्नी कार (गाडी क्र. एमएच १५ एएस २७९७) ही लेखानागरहून आडगावमार्गे जात असताना गाडी द्वारका चौकात पोहोचताच अचानक ह्याने पेट घेतला. घटना घडताच तत्काळ स्थानिक तरुणांनी प्रसंगवधान दाखवत जवळच्याच पेट्रोल पंपावरील अग्निप्रतिबंधक सिलेंडर आणत त्यावर माती आणि चिखलाचा मारा करत आगेवर नियंत्रण मिळवले.

ह्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित अपघातग्रस्त गाडीवर पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, पेट घेतलेली ओम्नी कार अनिल जाधव ह्या तरुणाची होती. हा तरुण आग लागताच गाडीतून पळ काढल्यामुळे सुखरूप बचावला आहे. यावेळी तरुणाने स्थानिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यावेळी आग मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक पोलिसांनी काही काळ वाहतूक बंद ठेवली होती, त्यामुळे चौकात वाहतूक कोंडीची स्थिती उद्भवली होती. नंतर आगेवर नियंत्रण मिळताच वाहतूक सुरळीत करण्यात आली.दरम्यान, या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here